शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

वाघाच्या हल्ल्यात बैल ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:34 IST

खडसंगी शिवारात मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाची दहशत पसरली आहे. अशातच परिसरात शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास सुभाष दोडके यांच्या शेतात वाघाने हल्ला करून गोरा ठार केला. या घटनेने पुन्हा शेतकरी भयभीत झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये दहशत : वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : खडसंगी शिवारात मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाची दहशत पसरली आहे. अशातच परिसरात शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास सुभाष दोडके यांच्या शेतात वाघाने हल्ला करून गोरा ठार केला. या घटनेने पुन्हा शेतकरी भयभीत झाले आहेत.मागील आठ दिवसांपासून खडसंगी व बरडघाट परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन होत आहे. खडसंगी येथील शेतकरी बबन कुबडे यांना शेतातून परत येत असताना गावापासून हाकेच्या अंतरावर वाघाचे प्रत्यक्ष दर्शन झाले. दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाºयांंनी पाहणी केली असता शेतात वाघाचे पगमार्क आढळले. परिसरात सध्या कापूस वेचणी व धान कापणीची कामे जोरात सुरू आहे. या घटनेने शेतात काम करणाºया मजुरांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली. पीक काढणीच्या वेळात शेतमजूर कामांवर येण्यास नकार देत आहेत. शेतकरी चिंता व्यक्त करीत आहे. वनविभागाने येथून वाघाला हुसकावून लावण्याची मागणी आहे.अन् ती अफवा निघालीखडसंगी येथून ५ किमी असलेल्या परसोडी येथे सकाळपासून जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. वनविभागाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाला भ्रमनध्वनी वरून अज्ञात इसमाने परसोडी शिवारात वाघाला विजेचा धक्का लागल्याची माहिती दिली होती. यावरून परिसरात गस्तीसाठी कर्मचाºयांचा ताफा पाठविला. यामध्ये एक क्षेत्र सहायक, तीन वनरक्षक व चार चौकीदार होते. चार वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या या गस्तीत परिसर पिंजून काढला. मात्र कुठेही वाघ व संशयास्पद ठिकाण आढळून आले नाही.सकाळी आठ वाजतापासून खडसंगी परिसरातील नागरिक शिवारात पोहोचले. वाघ प्रत्यक्ष बघण्याच्या हव्यासाने हजारो नागिरक विविध वाहनांनी परसोडीच्या दिशेने येत होते. एरव्ही व शांतता असणाऱ्या गावाला जत्रेचे स्वरूप आले होते.ताडाळीतही बैल ठारताडाळी : ताडाळी परिसरात वाघाने हल्ला करून एक बैल ठार केल्याची घटना ताडाळी शिवारात मंगळवारी सकाळी घडली. मिलिंद गजानन खांडाळकर हे बैलजोडीला शेतात घेऊन गेले. बैलांना शेतातील खुंटीला बांधून घराकडे परत आले. त्यानंतर अर्ध्या तासाने शेतात गेले असता वाघाने बैलावर हल्ला करून ठार केल्याचे दिसून आले. वनविभागाच्या चमूने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याचदिवशी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ताडाळी येथील मेंढपाळ शेळ्या व मेंढ्या घेऊन चराईला जंगलात गेला होता. वाघाने एका शेळीवर हल्ला केला. परंतु मेंढपाळाच्या समयसूचकतेने वाघाने पळ काढला. रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास एमआयडीसीतील जल शुद्धीकरण केंद्र व नंतर धारिवाल विद्युत निर्मिती प्रकल्पानजिक रेल्वे फाटक व टी पॉर्इंट परिसरात वाघ दिसल्याची चर्चा आहे.पट्टेदार वाघाचे शिवारात होणारे दर्शन व वाघाने ठार केलेल्या घटनेने शेतकऱ्यांसह मजुरवर्ग शेतकामावर जाण्यास घाबरत आहेत. पीक काढणीचा हंगाम सुरू असून कामे प्रभावित होत आहेत, या कडे वनविभागाने लक्ष देऊन वाघाचा बंदोबस्त करावा.- प्रमोद श्रीरामे, उपसरपंच