शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडोजरने कामगाराला चिरडले

By admin | Updated: June 11, 2014 23:50 IST

जीएमआर एमको कंपनीच्या आवारात रात्री बुलडोजर मशीनने काम करीत असताना बाजुला झोपलेल्या कामगारवरुन बुलडोजर गेल्याने एक २२ वर्षीय कामगार चिरडला गेला. रात्रीच संबंधित अधिकाऱ्यांनी

वरोरा: जीएमआर एमको कंपनीच्या आवारात रात्री बुलडोजर मशीनने काम करीत असताना बाजुला झोपलेल्या कामगारवरुन बुलडोजर गेल्याने एक २२ वर्षीय कामगार चिरडला गेला. रात्रीच संबंधित अधिकाऱ्यांनी जखमी कामगारास तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले. ही घटना माहिती होताच कामगार व नजीकच्या ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. जीएमआरएमको ही ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी वरोरा नजीकच्या मोहबाळा औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यरत आहे. १० जून रोजी वरोरा तालुक्यातील निमसडा गावातील २२ वर्षीय महेंद्र अनिल खंडाळकर हा कामगार रात्री पाळीत काम करण्याकरिता कंपनीच्या आवारात आला. महेंद्र कंपनीतील एका कंत्राटदाराकडे काम करीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. रात्री कंपनीच्या आवारात माती पसरविण्याचे काम बुलडोजरने सुरू होते. त्याच परिसरात महेंद्र झोपला होता. महेंद्र झोपला असल्याचे बुलडोजर चालक सुरेश कामडी यांच्या लक्षात आले नसल्याने बुलडोजर महेंद्रच्या अंगावरुन गेला. पहाटेच महेंद्रचा मृतदेह वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. कंपनीच्या आवारात अपघात होऊन कामगाराचा मृत्यू झाल्याची वार्ता कामगारात व परिसरातील गावात माहित होताच त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात कामगारांनी चांगलीच गर्दी केली होती. जोपर्यंत दोषीवर कारवाई व मृताच्या कुटुंबियांना आर्थिक लाभ मिळत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमिका उपस्थितांनी घेतल्याने काही काळ तणावसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी बुलडोजरचा चालक सुरेश कामडी याच्याविरुद्ध हयगय करून बुलडोजर चालविल्याप्रकरणी व सदर कामगाराच्या मृत्यूस जबाबदार असल्याने कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून ताब्यात घेतले आहे. मृताच्या कुटुंबियास आर्थिक मदत दिल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तणावाची स्थिती निवळली. उल्लेखनीय असे की काही दिवसांपूर्वी कामगार सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर कंपनीच्या आवारातच कामगाराचा मृत्यू झाल्याने कामगाराची सुरक्षितता पुन्हा ऐरणीवर आली असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)