गदचांदुर् येथे बसस्थानकाची निर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:27 IST2020-12-29T04:27:35+5:302020-12-29T04:27:35+5:30

---- झुडपाने वेढला रस्ता वणसडी : कोरपना तालुक्यातील लोणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झुडपे वाढलेली आहे. त्यामुळे वाहनधारकांना पुढील वाहन ...

Build a bus stand at Gadchandur | गदचांदुर् येथे बसस्थानकाची निर्मिती करा

गदचांदुर् येथे बसस्थानकाची निर्मिती करा

----

झुडपाने वेढला रस्ता

वणसडी : कोरपना तालुक्यातील लोणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झुडपे वाढलेली आहे. त्यामुळे वाहनधारकांना

पुढील वाहन दिसन येत नाही. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या झुडपाची कटाई करावी,अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

--

रस्त्याच्या कडांची सुधारना करा.

राजुरा : सास्ती ते बल्लारपूर मार्गावरील रस्त्याच्या बाजूच्या कडा खचल्या आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या कडांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

---

घुघुस - सिंदोला मार्गावर धुळीचे साम्राज्य

घुगुस : अत्यंत वर्दळीच्या शिंदोला मार्गावर मोठ्या प्रमाणात कोळशाची धूर असल्याने नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचत आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांना ताडपत्री सक्तीची करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. धुळीमुळे अनेकांना आजारही जडले जात आहे.

Web Title: Build a bus stand at Gadchandur