बुद्धाचे तत्वज्ञान हे सहिष्णुतेचे
By Admin | Updated: May 24, 2017 02:14 IST2017-05-24T02:14:58+5:302017-05-24T02:14:58+5:30
एकाने दुसऱ्याला विचार ऐकविण्याची संधी देणे, दुसऱ्यानेही समोरील व्यक्तीला तशीच संधी देणे ही सहिष्णुता झाली.

बुद्धाचे तत्वज्ञान हे सहिष्णुतेचे
वक्त्यांनी मांडले विचार : स्पर्धा व सत्कार समारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : एकाने दुसऱ्याला विचार ऐकविण्याची संधी देणे, दुसऱ्यानेही समोरील व्यक्तीला तशीच संधी देणे ही सहिष्णुता झाली. विचारांचे आदानप्रदान व एकमेकांना समजून घेणे ही सहिष्णुतेची अगदी सोपी व्याख्या! भगवान बुद्धाने आपल्या धम्मातून हीच शिकवण दिली आहे. त्यामुळे, भगवान बुद्धाचे तत्वज्ञान हे सहिष्णुतेचे आहे. याला नाकारता येत नाही, असे चिंतनशील विचार प्रा. डॉ. चंदू म्हस्के, हिराचंद बोरकुटे, प्रा.एस.टी. चिकटे, गोपाळराव देवगडे, एच.सी. सहारे यांनी व्यक्त केले.
येथील पंचशील समाज विकास आणि सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने सांस्कृतिक व प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात ‘तथागत बुद्धाच्या विचारातील सहिष्णुता व राष्ट्रवादी राष्ट्रनिर्मितीसाठी गरज’ या विषयावर प्रबोधन ठेवण्यात आले होते. त्यावर वरील वक्त्यांनी विचार मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. वनराज खोब्रागडे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, चंद्रपूर जि.म.बँकेचे माजी मानद सचिव जी.के. उपरे हे होते. वक्त्यांनी धर्म आणि धम्म तसेच देश आणि राष्ट्र यातील फरक कसा हे सांगितले. काही वक्त्यांनी देशातील सद्य:स्थितीचा आढावा घेवून देश कसा असहिष्णुतेतून जात आहे असे सांगत चिंता व्यक्त केली. प्रास्ताविक एम.टी. साव यांनी केले. प्रबोधनपर भाषणानंतर मंगल जीवने, वसंत खेडेकर, डॉ. कुणाल उदेमान वानखेडे, आनंद तेलंग, रिंगू ईश्वर उपरे, समीक्षा महेंद्र सोरते यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या एक दिवसांपूर्वी ेनृत्य स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात विजयी ठरलेले प्रथम प्रेरणा सोनारकर, द्वितीय महेश विश्वकर्मा, तृतीय व्यंकटेश मालोद तसेच उत्तेजनपर मृण्मयी सोनारकर, पूजा मांडवकर, प्रणाली भोयर, पियुश डांगे, संचिता कारवले यांना पुरस्कार देण्यात आले.
परीक्षक सुकेशनी मेश्राम व राजेश कैथवास यांचा सत्कार करण्यात आला. संचालन संजय रामटेके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आत्माराम भसारकर, गुरुदेव रंगारी, सिद्धार्थ रामटेके, उदेमान वानखेडे, मोरेश्वर तेलंग, वंदना गेडाम, रमेश तावाडे, देवका चिवंडे आदींनी परिश्रम घेतले.