शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

आसोलामेंढा तलावाच्या नूतनीकरणाला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:54 PM

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत येत असलेल्या आसोला मेंढा तलावाची उंची वाढविण्यासाठी बुडीत क्षेत्रातील सुमारे २९८.०२ हे. वनजमिनीची आवश्यकता आहे. मात्र वन कायद्याच्या अडथळ्याने या प्रकल्पाला लगाम लागला आहे.

ठळक मुद्देप्रकल्प १० वर्षे मागे : प्रस्ताव केंद्रीय वन प्रशासनाकडे धूळखात

उदय गडकरी।लोकमत न्यूज नेटवर्कसावली : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत येत असलेल्या आसोला मेंढा तलावाची उंची वाढविण्यासाठी बुडीत क्षेत्रातील सुमारे २९८.०२ हे. वनजमिनीची आवश्यकता आहे. मात्र वन कायद्याच्या अडथळ्याने या प्रकल्पाला लगाम लागला आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून तो प्रस्ताव केंद्रीय वन प्रशासनाकडे धूळखात पडल्याची माहिती आहे. या कारणाने सदर प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आणखी १० वर्षे मागे जावे लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.आसोला मेंढा धरणाची उंची २.७ मीटरने वाढविण्याचे प्रस्तावित आहे. त्यामध्ये बुडीत क्षेत्रातील सुमारे २९८.०२ हे.आर. इतकी वन जमीन लागणार आहे. याशिवाय मुख्य कालव्याच्या ० ते ३ कि.मी. अंतरापर्यंतच्या रुंदीकरणासाठीही वन जमिनीची आवश्यकता आहे. सदर वन जमीन ही वन प्रशासनाच्या तीन विभागात विभागली गेली आहे. यात विभागीय वनाधिकारी कार्यालय ब्रह्मपुरी १६९.८०९ हे., विभागीय वनाधिकारी कार्यालय, चंद्रपूर १०८.४४२ हे. तर विभागीय वनाधिकारी कार्यालय मध्य चांदा १९.८८ हे. अशी मिळून २९८.०२ हेक्टर वनजमीन सदर प्रकल्पाकरिता लागणार आहे.या प्रकल्पासाठी लागणाऱ्या वनजमिनीचे मोजमाप वन विभाग व गोसेखुर्द प्रकल्पाच्या कार्यालयातर्फे संयुक्तपणे करण्यात आले आहे. मात्र वनविभागाकडून अजूनही प्रस्तावास मान्यता मिळाली नसल्याने आसोला मेंढा तलावाची उंची वाढविण्याचे आणि नहराच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. परिणामी शासनाने २०१९ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे दिलेले आश्वासन हवेत विरणार की काय, अशी भीती वर्तविली जात आहे. शासनाने आतापर्यंत या प्रकल्पाची कोणतीच कामे केली नाही. आसोला मेंढा तलावाची क्षमता वाढविणे व मुख्य नहराचे रुंदीकरण केल्यास ५२ हजार ३६० हेक्टर सिंचन होणार आहे. आज प्रत्यक्षात केवळ नऊ हजार ९१९ हेक्टरचे सिंचन होत आहे.मी या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी या नात्याने आसोलामेंढा तलावाच्या कालव्याचे नुतनीकरण हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. यातून मोठ्या प्रमाणात सिंचन होवून शेतकरी सुजलाम सुफलाम झालेला मला पाहायचा आहे. त्यात वन कायद्याच्या अडथळा असला तरी तो लवकरच निकाली निघणार असून त्यासाठी मी अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आहेत. याशिवाय येत्या काही दिवसात किमान दीड हजार कोटींची कामे मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यामुळे आसोलामेंढा तलावाची क्षमता वाढविण्याच्या कामाला गती येईल.- आ. विजय वडेट्टीवार, सावली-ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रतथा विधीमंडळ उपगटनेता, मुंबई.