चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाहीत विहिरीत आढळला विद्यार्थिनीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 12:09 IST2017-11-22T12:08:21+5:302017-11-22T12:09:03+5:30

सिंदेवाही येथील सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत असलेल्या कु. काजल रावजी हनुमते (१७) हिचा मृतदेह बुधवारी सकाळी ७.३० च्या सुमारास येथील विहिरीत आढळून आला.

The body of the woman was found in the well in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाहीत विहिरीत आढळला विद्यार्थिनीचा मृतदेह

चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाहीत विहिरीत आढळला विद्यार्थिनीचा मृतदेह

ठळक मुद्देतीन दिवसांपासून बेपत्ता होती

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर- सिंदेवाही येथील सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत असलेल्या कु. काजल रावजी हनुमते (१७) हिचा मृतदेह बुधवारी सकाळी ७.३० च्या सुमारास येथील विहिरीत आढळून आला. ती येथे आपल्या काकांकडे राहून शिकत होती. ती मूळची लोनखैरी येथील रहिवासी होती. गेल्या तीन दिवसांपासून ती घरातून निघून गेल्याचे सांगेण्यात येते. सिंदेवाहीजवळील सिद्धार्थ चौकात असलेल्या विहिरीत तिचा मृतदेह सकाळच्या वेळेस नागरिकांना आढळून आला. पोलीस तपास सुरू आहे.

Web Title: The body of the woman was found in the well in Chandrapur district

टॅग्स :Crimeगुन्हा