शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दोघांचाही मृतदेह आढळला; वैनगंगा नदीत नाव उलटल्याची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 18:27 IST

स्थानिक मच्छिमारांना त्या दोघांचा मृतदेह नदीघाटावरुन शंभर मीटर अंतरावर आढळून आला.

चंद्रपूर: वैनगंगा नदीपात्राच्या कढोली-हरांबा घाटावर अंत्यविधीसाठी जाताना नाव उलटल्याने दोघेजण बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. त्या दोघांचा पानबुड्याकडून शोध सुरु होता. बुधवारी दुपारच्या सुमारास स्थानिक मच्छिमारांना त्या दोघांचा मृतदेह नदीघाटावरुन शंभर मीटर अंतरावर आढळून आला. रामचंद्र हनुजी पेंदाम (४०), परशुराम वाघु आत्राम (४२) दोघेही रा. राजगोपालपुरी ता. चामोर्शी असे मृत युवकांचे नाव आहे. 

कढोली येथील एका महिलेचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्या महिलेवर कढोली-हरांबा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. अंत्यविधीसाठी गडचिरोली-चामोर्शी येथील आप्तेष्ठ नावेने येत होते. नदीघाट १०० मीटर अंतरावर असताना नाव अचानक डोहात उलटली. यावेळी नावेमध्ये बसलेले आठजण नदीत बुडाले.  पोलीस व नागरिकांच्या मदतीने अमलजित सुरेश कन्नाके (३०), देवराव मोहन कन्नाके (४०), केशव मोहन कन्नाके (४५), गंगाधर सोमू वेलादी (५३), संदीप देवराम कन्नाके (३५), कमला देवराव कन्नाके या सहा जणांना खोल डोहातून सुखरूप बाहेर काढले.

मात्र रामचंद्र हनुजी पेंदाम व परशुराम आत्राम यांचा पत्ता लागला नाही. त्यामुळे सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी चंद्रपूर व गडचिरोली येथील पानबुड्यांची चमू बोलावली. या चमूच्या सहाय्याने रात्रीपर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र त्या दोघांचा पत्ता लागला नाही. बुधवारी पोलीस प्रशासनाने स्थानिक मच्छिमाराच्या सहाय्याने शोधमोहीम राबवली. दरम्यान दुपारच्या सुमारास नदीघाटापासून शंभर मीटर अंतरावर त्या दोघांचाही मृतदेह आढळून आला. यावेळी ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्यासह सावली पोलिसांची चमू उपस्थित होती. 

नावेमधून उडी घेतल्याने घडली घटना

त्या नावेला छोटे छिद्र होते. त्यामुळे नावेमध्ये पाणी जमा होत होते. काही अंतर पार केल्यानंतर नावेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. त्यामुळे दोघांनी नावेमधून उडी घेतली. परिणामी नावेचे संतुलन बिघडले. त्यामुळे नाव पलटी झाली.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र