युवा ब्रिगेडतर्फे वलनी येथे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:46 IST2021-05-05T04:46:46+5:302021-05-05T04:46:46+5:30
सावरगाव : कोरोना महामारीच्या कालखंडात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागभीड तालुक्यातील वलनी मेंढा येथील युवा ब्रिगेड संघटना ...

युवा ब्रिगेडतर्फे वलनी येथे रक्तदान शिबिर
सावरगाव : कोरोना महामारीच्या कालखंडात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागभीड तालुक्यातील वलनी मेंढा येथील
युवा ब्रिगेड संघटना व जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वलनी येथे सोमवारी रक्तदान शिबिर पार पडले. या रक्तदान शिबिरात २० जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
मागील वर्षीसुद्धा या संघटनेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अतुल वाघाडे, अक्षय वाघाडे, पराग झोडे, अमित नेवारे, आदित्य बावणे, सुरेन बावणे, अतुल झोडे, ज्ञानेश्र्वर झोडे, अतुल दोडके, नरेश नेवारे, जयेश पर्वते, बालू लोखंडे, वैभव लोखंडे, पवन मसराम, चेतन बोरकर, होमदेव बोरकर, प्रदीप गायकवाड, विशाल नरुके, नीतेश नरूके, रवी मुळेवार आदींनी सहभाग घेतला होता. शिबिर यशस्वीतेसाठी युवा ब्रिगेड संघटनेचे अनिकेत झोडे, सचिन मडावी, सुनील बोरकर, नितीन गड्डमवार, रवी मुळेवार, विकास बोरकर, आदित्य बावणे आदींनी प्रयत्न केले.