वाहनगाव येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST2021-04-03T04:24:09+5:302021-04-03T04:24:09+5:30

मौजा वाहनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम रुग्णसेवा ग्रुप समिती यांच्या ...

Blood donation camp at Vahangaon | वाहनगाव येथे रक्तदान शिबिर

वाहनगाव येथे रक्तदान शिबिर

मौजा वाहनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

हा कार्यक्रम रुग्णसेवा ग्रुप समिती यांच्या सौजन्यातून करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष रेखा दिलीप कारेकार या होत्या. तसेच वाहनगाव येथील सरपंच प्रशांत कोल्हे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात उपस्थित ३२ रक्तदात्यांनी आपले रक्त देऊन अत्यंत गरजेच्या वेळी कोणालाही रक्ताची गरज भासली तर रक्त पेढीतून देण्यात येईल, अशा प्रकारे सर्व रक्तदात्यांनी समाजाला माणुसकीचा संदेश दिला. या कार्यक्रमाला रुग्णसेवा युवा ग्रुपचे रोशन आत्राम, चेतन आत्राम, कल्पेश ढोक, अतुल श्रीरामे, रोहित खोब्रागडे, पंढरी आत्राम, आशिष राऊत, अक्षय केमये, अमन फुलझेले, भारत मेश्राम, राणा बावरी व गावातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Blood donation camp at Vahangaon