जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त उद्या रक्तदान शिबिर
By Admin | Updated: July 1, 2014 01:23 IST2014-07-01T01:23:05+5:302014-07-01T01:23:05+5:30
लोकमत वृत्तपत्र समूह, जीवनज्योती ब्लड बँक आणि कम्पोनेट लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने २ जुलै रोजी लोकमतचे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान

जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त उद्या रक्तदान शिबिर
चंद्रपूर : लोकमत वृत्तपत्र समूह, जीवनज्योती ब्लड बँक आणि कम्पोनेट लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने २ जुलै रोजी लोकमतचे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक चंद्रपूर गडचिरोली श्रमिक पत्रकार संघ वरोरा नाका येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत वृत्तपत्र समुहाचे सर्व वाचक, स्नेही, लोकमत सखी मंच सदस्य, युवा नेक्स्ट सदस्य व जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन लोकमत समुहाच्या वतीने करण्यात आले आहे.
शिबिराबाबतच्या अधिक माहितीसाठी लोकमत जिल्हा कार्यालय, दुसरा माळा, धनराज प्लाझा, मेन रोड, चंद्रपूर, २५२१०१ किंवा ९०११३२२६७४, या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)