राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ब्रह्मपुरी येथे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:27 IST2021-04-11T04:27:15+5:302021-04-11T04:27:15+5:30
ब्रह्मपुरी : सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. विविध आजाराने ग्रस्त गंभीर रुग्णांना ...

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ब्रह्मपुरी येथे रक्तदान शिबिर
ब्रह्मपुरी : सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. विविध आजाराने ग्रस्त गंभीर रुग्णांना रक्ताची गरज भासत आहेे; परंतु राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा होत नाही. ही बाब गंभीर असल्याने तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ब्रह्मपुरी शहरातील ख्रिस्तानंद रुग्णालय रक्तपेढी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनोज वझाडे, मनोज कराडे, तुळशीराम काटलाम, मंगेश भुते, राजेश तलमले, राकेश शेंडे, परीक्षित कामडी, गोलू मेश्राम, राजेश माटे, निखिल करंबे, अक्षय शेंडे, निखिल सहारे, चेतन दिवटे, अंकुश राखडे, उमेश गणवीर, महेश तलमले, भूषण मोहुर्ले, पिंटू सोंदरकर, प्रशांत तलमले, प्रफुल करंडे, राजू पिलारे, जनता ठेंगरी, अमोल ठेंगरी, अतुल राऊत, सुधीर पिलारे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्वाचा परिचय दिला.