सीएसटीपीएसच्या वर्धापनदिनी पहिल्यांदाच १०३७ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:25 AM2021-01-17T04:25:09+5:302021-01-17T04:25:09+5:30

चंद्रपूर : चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन (सीएसटीपीएस) च्या ३७ व्या वर्धापनदिनी शनिवारी महारक्तदान शिबिर घेण्यात आले. मुख्य ...

Blood donation of 1037 people for the first time on the anniversary of CSTPS | सीएसटीपीएसच्या वर्धापनदिनी पहिल्यांदाच १०३७ जणांचे रक्तदान

सीएसटीपीएसच्या वर्धापनदिनी पहिल्यांदाच १०३७ जणांचे रक्तदान

googlenewsNext

चंद्रपूर : चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन (सीएसटीपीएस) च्या ३७ व्या वर्धापनदिनी शनिवारी महारक्तदान शिबिर घेण्यात आले. मुख्य अधीक्षक अभियंता पंकज सपाटे यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच तब्बल १ हजार ३७ जणांनी रक्तदान करून कोरोनाच्या अस्वस्थ कालावधीत रुग्णांप्रति सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. विशेष म्हणजे, शिबिराप्रसंगी प्रचंड गर्दी असतानाही कोविड -१९ च्या सर्व खबरदारीचे

कोटकोरपणे पालन करण्यात आले.

महानिर्मितीचे मुख्य प्रबंधक संजय खंदारे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून संचालक (खनिज) पुरुषोत्तम जाधव संचालक खनिज, बाळासाहेब थिटे संचालक (वित्त), राजु बुरडे, संचालक (संचालन) यांच्या मार्गदर्शनाखाली सीएसटीपीएसचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्या नेतृत्वात कार्यतत्पर पथके तयार करण्यात आली होती. त्यामुळे वीज निर्मितीत योगदान देण्यासोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून महारक्तदान शिबिराला अधिकारी, कर्मचारी यांनी उत्तम प्रतिसाद दिला.

यावेळी वर्धापन दिन समितीचे सचिव व अधीक्षक अभियंता सुहास जाधव, उपमुख्य अभियंता राजेश राजगडकर, उपमुख्य अभियंता राजेशकुमार ओसवाल, उपमुख्य अभियंता किशोर राऊत, उपमुख्य अभियंता मदन अहीरकर, राजू सोमकुवर, अधीक्षक अभियंता पुनसे, उपासे, बोरक, अनिल गंधे, कुलकर्णी, तायडे, मानव संसाधन विभागाचे अरविंद वानखेडे, अग्निशमन दलाचे अधिकारी देशमुख, कल्याण अधिकारी आनंद वाघमारे, डॉ. संगिता बोधलकर, प्रशिक्षण विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता राजकुमार गिमेकर , इतर अधिकारी कर्मचारी कंत्राटी कामगार, सर्व संघटनाचे प्रतिनिधी व सामाजिक संस्था. सुरक्षा विभागाचे अभय मस्के, वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक आभासिंग व सीआयएसएफचे पूर्वपेंद्रकुमार व सुरक्षा विभागाचे व्यवस्थापक साळवे यांनी सहकार्य केले.

उत्तम नियोजनाची फलश्रुती

रक्तदान शिबिरासाठी जिल्हा सामान्य रूग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीपुरते मर्यादित न ठेवता आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यालाही समावून घेण्यात आले. उपराजधानी नागपूर येथील रक्तपेढी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चमूनेही मोलाचे योगदान दिले. शिबिरात १०३७ जणांनी रक्तदान केले. जिल्हा सामान्य रुग्णालयात, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे यांनी तिन्ही जिल्ह्याच्या रक्तपेढीशी संपर्क साधून उत्तम नियोजन केले.

Web Title: Blood donation of 1037 people for the first time on the anniversary of CSTPS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.