BJP's Elgar against the state government | राज्य सरकारविरूद्ध भाजपचा एल्गार

राज्य सरकारविरूद्ध भाजपचा एल्गार

ठळक मुद्देजनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपकर्जमुक्ती योजना फसवी असल्याची टीकासर्व तहसीलदारांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी विकास योजना राबविण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करून भाजपने पुकारलेल्या राज्यव्यापी धरणे आंदोलनाला जिल्ह्यातही मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व तहसील कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी १२ ते सायंकाळी पाच वाजतापर्यंत धरणे देऊन तहसीलदारामार्फत प्रलंबित मागण्यांचे निवेदन मु्ख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. आंदोलनादरम्यान जिल्हाभरात कुठेही अनुचित घटना घडली नाही.

राजुरा : माजी आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर आंदोलन झाले. यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजपचे जिल्हा सचिव अरूण म्हस्की, जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे, सतीश धोटे, विनायक देशमुख, भाऊराव चंदनखेडे, दिलीप वांढरे, प्रशांत घरोटे, सचिन शेंडे, सचिन डोहे, रवी बुरडकर,पंचायत समिती सदस्य सुनंदा डोंगे, नैना परचाके, नगरसेविका उज्वला जयपूरकर, प्रिती रेकलवार, मंजुषा अनमूलवार, सुरेश रागीट, प्रशांत साळवे, हरी झाडे, विलास खिरटकर, संदीप पारखी, संजय पावडे, नितीन बामरटकर उपस्थित होते. माजी आमदार अ‍ॅड. धोटे यांच्या उपस्थितीत जिवतीतही आंदोलन झाले.
मूल : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या व जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय परिसरात आंदोलन करण्यात आले. विकासाचा निधी कपात केल्याने जिल्ह्यावर अनिष्ट परिणाम होणार झाल्याचा आरोप अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी केला. यावेळी पंचायत समितीचे सभापती चंदु मारगोनवार, उपसभापती घनश्याम जुमनाके, नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, माजी सभापती पुजा डोहणे उपस्थित होते.
नागभीड : येथील तहसील कार्यालय परिसरातील आंदोलनात नगर परिषदेचे उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, बांधकाम सभापती सचिन आकुलवार, रूपेश गायकवाड, दुर्गा चिलबुले , नगरसेवक गौतम राऊत, शिरीष वानखेडे, नगरसेविका अर्चना मरकाम, प्रगती धकाते, बंडू क्षीरसागर, राजू चिलबुले, इंदू आंबोरकर सहभागी झाले होते.
गोंडपिपरी : तालुका भाजपने तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. तालुकाध्यक्ष बबन निकोडे, साईनाथ मास्टे, पं. स. सभापती सुनीता येग्गेवार, माजी सभापती दीपक सातपुते, जि.प.सदस्य स्वाती वडपल्लीवार, माजी जि.प.सदस्य अमर बोडलवार, माजी उपसभापती मनीष वासमवार रवी पावडे, आश्विन कुसनाके, माजी नगराध्यक्ष संजय झाडे, उपाध्यक्ष चेतन गौर, प्रकाश उत्तुरवार, निलेश संगमवार, गणपती चौधरी गुरुजी, निलेश पुलगमकर, रामदास शेंडे, राकेश पुन, बाळू फुकट, गणेश डहाळे, विनोद पाल व बहुसंख्या कार्यकर्ते उपस्थित होते.
भिसी : येथील अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर झालेल्या धरणे आंदोलनात भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत वारजुकर, पंचायत समिती सदस्य प्रदीप कामडी, बंडु जावळेकर, सरपंच योगिता गोहणे, गोपीनाथ ठोंबरे, अनिल शेंडे, अविनाश बारोकर, प्रफुल्ल कोलते, मधुकर मानकर, किशोर आष्टणकर व कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, महिला अत्याचारांवर प्रतिबंध घालावा, जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवावी, आदी मागण्यांचे निवेदन अप्पर तहसीलदार पी. पी. पाटील यांना देण्यात आले.
गडचांदूर : कोरपना येथे भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण हिवरकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयासमोर आंदोलन झाले. यावेळी नारायण हिवरकर, सतीश उपलेंचवार, मनोहर कुरसंगे, नत्थू पाटील ढवस, हरीश घोरे, संजय मुसळे, किशोर बावणे, रमेश मालेकर, गंगाधर कुटलवर, भारत चन्ने, अमोल आसेकर, पुरुषोत्तम भोंगळे, कवडू पाटील जरिले, विजया लक्ष्मी डोहे, नीलेश ताजने, रामसेवक मोरे अरविंद डोहे, संदीप शेरकि शशिकांत आडकिने, विजय रणदिवे, यशवंत इंगळे, विनोद नवले, नजीर खान, हरबाजी झाडे, पद्माकर दगडी उपस्थित होते.
चिमूर : भाजपच्या वतीने तहसील कार्यालयसमोर आंदोलन झाले. शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी संकपाळ यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष रेखा कारेकर, वसंत वारजूकर, राजु देवतळे , जि. प. सदस्य मनोज मामीडवार, पं. स. सदस्य पुंडलीक मते, भाजप महिला जिल्हा उपाध्यक्ष पायल कापसे, माया ननावरे,ज्योती ठाकरे, कल्याणी सातपुते, दुर्गा चावरे,दीक्षा पाटील, बंडू जावळेकर, सुनिल किटे नाजमा शेख,मनिष तुमपल्लीवार सचिन फरकाडे, सुरज नरुले, प्रशांत बदखल, प्रशांत चिडे,विलास बारापत्रे, सावन गाडगे, ओम गणोरकर, प्रवीण गणोरकर डॉ. देवनाथ गंधरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कलिम शेख, संदीप पिसे, विनोद चोखरे,नगरसेवक भारती गोडे आदींसह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.
सावली : तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार कुमरे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष अविनाश पाल, सतीश बोम्मावार, जि. प. सदस्य,संजय गजपुर, योगिता डबले, मनीषा चिमूरकर संतोष तंगडपल्लीवार, पं. स. उपसभापती रवी बोलीवर, माजी पं. स. सभापती छाया शेंडे, गणपत कोठारे, विनोद धोटे, अशोक आक्कूलवार, प्रकाश खजांजी,अर्जुन भोयर, अरुण पाल, सुदर्शन चामलवार, राकेश कोंडबंतूनवार, प्रसाद जक्कुलवार, देवानंद पाल, प्रवीण देशमुख, शरद सोनवणे, गोटू गुरनुले व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन दिलीप ठिकरे यांनी केले. आभार दीपक शेंडे यांनी मानले.
पोंभुर्णा : येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार डॉ. खटके यांना निवेदन देण्यात आले.यावेळी प्रमोद कडू, रामजी, गजानन गोरंटीवार, राहुल संतोषवार, अल्का आत्राम, ज्योती बुरांडे, श्वेता वनकर, रजीया कुरेशी, विनोद देशमुख, हरीष ढवस, बंडू बुरांडे, ईश्वर नैताम, अजित मंगळगिरीवार, मोहन चलाख, नेहा बघेल, शारदा कोडापे, मनु रणदिवे व कार्यकर्ते सहभागी झाले.
सिंदेवाही : तालुका भाजपतर्फे शिवाजी चौकात सरकार विरोधात धरेण आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी जि.प. समाजकल्याए सभापती नागराज गेडाम, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष राजू बोरकर, कमलाकर सिध्दमशेट्टीवार, गोपीचंद्र गणवीर पं. स. सदस् रणधिर दुपारे, लोकनाथ बोरकर, रितेश अलमस्त व कार्यकर्ते उपस्थित होते.
वरोरा : तहसीलदार सचिन गोसावी यांनी भाजपातर्फे देण्यात आले. तहसीलदारांना भेटलेल्या शिष्टमंडळात जिल्हा भाजपा उपाध्यक्ष बाबा भागडे, तालुका भाजपा संघटक ओम मांडवकर, शहर भाजपा अध्यक्ष सुरेश महाजन तालुका महामंत्री रवी कष्टी, निलजईचे सरपंच नितीन हिरवकर, जिल्हा परिषद बांधकाम समिती राजू गायकवाड, पंचायत समिती सदस्य वंदन दाते, सायरा शेख, कीर्ती कातोरे, सचिन नरड आदींचा समावेश होता. उपविभागीय कार्यालयासमोर सकाळपासून सुरू झालेल्या या आंदोलनात तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांचाही आंदोलनात सहभाग
ब्रह्मपुरी : भाजपच्या वतीने शिवाजी चौकात सरकारविरूद्ध धरणे आंदोलन केले. माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी राज्य सरकार धान खरेदीचे चुकारे व बोनस अपयशी ठरल्याचा आरोप केला. यावेळी प्रा. कादर शेख, प्रा. संजय लांबे, सभापती प्रा. रामलाल दोनाडकर, प्रा. अशोक सालोटकर, प्रा. अरुण शेंडे, प्रा. प्रकाश बगमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नामदेव लांजेवार, नगरसेवक मनोज मोठे सरपंच ज्ञानेश्वर भोयर, पं. स. सदस्य उर्मिला धोटे, प्रा. रवी आष्टीकर, वंदना शेंडे, डॉ. गोकुल बालपांडे, सुधीर सेलोकर, बाळू नंदूरकर, रितेश दशमवार,विलास खरवडे,माजी नगरसेवक मनोज भूपाल, अनघा दंडवते,मंजेरी राजनकर, पुष्पा गराडे, प्रकाश नन्नावरे, रामभाऊ निहाटे, माणिक थेरकर, पांडुरंग भोयर व शेतकरीही बहुसंख्येने उपस्थित होते

युवकांची लक्षणीय उपस्थिती
भद्रावती : भाजपतर्फे तहसील कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे भद्रावती विधानसभाप्रमुख विजय राऊत, तालुका अध्यक्ष तुळशीराम श्रीरामे, शहर अध्यक्ष प्रविण सातपुते, तालुका महामंत्री नरेंद्र जिवतोडे किशोर गोवारदिपे, पं. स. उपसभापती प्रवीण ठेंगणे, जि. प. सदस्य यशवंत वाघ, मारोती गायकवाड, सोनकुसरे गुरूजी, शेख, शंकर अन्ना, संतोष कोपावार, अनिल बंगडे व युवकांची लक्षणीय उपस्थित होती.

योजनांना स्थगिती देणारे सरकार : सुधीर मुनगंटीवार
राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील गांधी चौकात आंदोलन करणाºया जनतेला भ्रमणध्वनीवरून संबोधित केले. ते म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आघाडी सरकार नसून स्थगिती सरकार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शासनाने घेतलेल्या सर्व जनपयोगी योजनांना स्थगिती देण्याचा सपाटा सरकारने चालविला. राज्यातील बांधकाम मजूरांना आवश्यक साहित्य घेण्यासाठी सरसकट पाच हजार रूपये देण्याचा निर्णय महायुती शासनाने घेतला होता. हा निर्णयही ठाकरे

Web Title: BJP's Elgar against the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.