शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
2
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
3
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
4
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
5
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
6
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
7
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
8
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
9
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
10
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
11
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
12
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
13
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
14
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
15
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
16
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
17
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
18
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
19
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
20
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात भाजपचा गोंधळ, दिला चुकीचा एबी फॉर्म ! उमेदवारावर अपक्ष लढण्याची परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:14 IST

Chandrapur : मनपा निवडणुकीसाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी एकाच प्रभागांत दोन-तीन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने मोठा वाद उफाळून आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मनपा निवडणुकीसाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी एकाच प्रभागांत दोन-तीन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने मोठा वाद उफाळून आला होता. या गोंधळात एकोरी मंदिर १० ब. (नामाप्र महिला) प्रभागातील भाजपच्या उमेदवार सरिता विकास घटे यांना चुकीचा एबी फॉर्म दिल्याने निवडणूक प्रशासनाने तो बाद केला. त्या आता अपक्ष उमेदवार म्हणून 'एअर कंडिशनर' चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने भाजपवर नामुष्की ओढवली आहे.

भाजपकडून उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुकांनी स्थानिक नेत्यांकडे रांगा लावल्या होत्या. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप उमेदवारांची यादी अंतिम करून निवडणूक निरीक्षक आणि स्थानिक नेत्यांकडे एबी फॉर्म दिला होता. दरम्यान, प्रदेशाध्यक्षांच्या यादीतील नावे बदलविण्याने भाजप शहर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टवार यांना पद गमवावे लागले. एकोरी मंदिर १० ब प्रभागातील (नामाप्र महिला) राखीव जागेसाठी भाजपकडून सरिता विकास घटे यांनी नामांकन दाखल केला होता, परंतु राजकीय गोंधळात त्यांना एकोरी ब गटाऐवजी दुसऱ्या गटाचा एबी फॉर्म देण्यात आला.

छाननी प्रक्रियेत घटे यांचा एबी फॉर्म रद्द झाला. त्यामुळे घटे यांना भाजपच्या कमळ चिन्हाऐवजी अपक्ष म्हणून एअर कंडिशनर या चिन्हावर निवडणूक लढवावी लागत आहेत. या प्रभागात १० ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) च्या विणा खनके, उद्धवसेनेच्या छाया बरडे, काँग्रेसच्या संजीवनी वासेकर आदींसह एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत.

रवी जोगी अपक्ष उमेदवार

भाजपचे कट्टर समर्थक असलेले प्रा. रवी जोगी यांनी वडगाव प्रभागातून उमेदवारी मागितली होती. त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. एबी फार्मसुद्धा देण्यात आला. मात्र अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच उमेदवाराला भाजपचा एबी फार्म मिळाल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला. त्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवित आहे. त्याचा फटका येथील भाजप उमेदवारांना बसणार असल्याचे बोलल्या जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP chaos in Chandrapur: Wrong form forces independent candidacy.

Web Summary : BJP's Chandrapur unit embroiled in chaos after issuing incorrect AB forms. A candidate now contests independently due to the error. Another BJP supporter will contest independently after being promised a ticket and later denied.
टॅग्स :Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग