भाजप राबविणार सेवा व समर्पक अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:34 AM2021-09-17T04:34:17+5:302021-09-17T04:34:17+5:30

माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात, तसेच महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात ...

BJP will implement service and related campaigns | भाजप राबविणार सेवा व समर्पक अभियान

भाजप राबविणार सेवा व समर्पक अभियान

Next

माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात, तसेच महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरतर्फे शुक्रवार(दि. १७ सप्टेंबर)पासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा व समर्पण अभियान राबविणार आहे. उद्या सकाळी नऊ वाजता महानगरातील मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा व बुद्धविहारात प्रार्थना केली जाणार आहे. याच दिवशी आभासी व्यासपीठावर पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महानगरातील ३०० बुथवर प्रत्येकी २१ लोकांचा केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासोबत विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. १७ ते २२ सप्टेंबरपर्यंत प्रभाग १७ मध्ये चित्रकला स्पर्धा व स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पेट्रोल दरवाढसंदर्भात असलेली सत्यता लोकांसमोर मांडण्याचा संकल्प भाजपने केला आहे. सेवा व समर्पण अभियानासाठी महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, मनपा स्थायी समिती सभापती रवी आसवानी, भाजप नेते राजेंद्र गांधी, प्रकाश धारणे, सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले, विशाल निंबाळकर, अंजली घोटेकर,विठ्ठल डुकरे, संदीप आगलावे, रवी लोणकर, सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर, मनोरंजन रॉय, डॉ. किरण देशपांडे, छबू वैरागडे, धनराज कोवे, सपना नामपल्लीवार, स्मिता रेभनकर, राजकुमार पाठक, प्रीती भूषणवार, राम हरणे, शशिकांत मस्के, रामकुमार आक्केपल्लीवार, पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Web Title: BJP will implement service and related campaigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.