शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाह अन् राज ठाकरेंची मुंबईत भेट होणार?; भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलं स्पष्टीकरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 14:18 IST

अमित शाह आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चंद्रपूर- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिंदेगट आणि भाजपाच्या नेत्यांकडून मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या सातत्याने भेटीगाठी घेतल्या जात आहेत. त्यामुळे भाजपा-मनसे युती होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ५ सप्टेंबरला मुंबईत येत आहेत. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान भाजपा आणि मनसे युतीचा नारळ फुटणार असल्याची चिन्हं दिसून येत आहे. 

अमित शाह आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपा आणि मनसेकडून अमित शाह आणि राज ठाकरे यांची भेट होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह आणि राज ठाकरेंच्या भेटीबाबत मला कल्पना नाही. भविष्यात काय होईल हे आज चिंतन करणं योग्य होणार नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. 

राज ठाकरे यांना आम्ही मित्र म्हणून भेटायला जातो. राजकीय चर्चेसाठी जात नाही, असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणुक लढेल. भाजपा आणि शिवसेना युती होईल. याआधी इतके यश मिळाले नसेल, त्यापेक्षा जास्त यश या सरकारमध्ये प्राप्त होईल, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. 

भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना एकत्र येऊन आम्ही वरळीबरोबरच मुंबई महापालिका निश्चितपणे जिंकू, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप मिळून मुंबई महापालिका जिंकेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

मुंबई पालिकेतील शिवसेनेची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी भाजप कंबर कसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका निवडणुका पुढील वर्षीच्या सुरूवातीला होतील, असे म्हटले जात असताना दोन-अडीच महिन्यांतच मुंबई पालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी भाजपने चालविली आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAmit Shahअमित शाहBJPभाजपाChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे