राजुरा येथे आठ कोटींच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन

By Admin | Updated: September 6, 2014 01:45 IST2014-09-06T01:45:42+5:302014-09-06T01:45:42+5:30

येथे ८ कोटी ४३ लाख ४६ हजार किमतीच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन राजुराचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.

Bhatipujan of Subdivision Hospital at Rajura, worth Rs 8 crores | राजुरा येथे आठ कोटींच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन

राजुरा येथे आठ कोटींच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन

राजुरा : येथे ८ कोटी ४३ लाख ४६ हजार किमतीच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन राजुराचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यावरण मंत्री ना. संजय देवतळे यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी राजुराचे माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, नगर परिषद राजुराचे अध्यक्ष मंगला आत्राम, उपाध्यक्ष अरुण धोटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद सोनुले, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, वैद्यकिय अधिक्षक डॉ. लहू कुळमेथे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दादा पा. लांडे, जि.प. सदस्य अविनाश जाधव, नानाजी आदे, राजुरा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनिल देशपांडे, नगर परिषदेचे गटनेते स्वामी येरोलवार उपस्थित होते.
राजुरा येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय निर्माण व्हावे, याकरिता राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी प्राप्त करून घेतली होती. परंतु ग्रामीण रुग्णालय राजुरा जि. चंद्रपूर येथील ३० खाटावरून १०० खाटांच्या श्रेणवर्धीत उपजिल्हा रुग्णालय बांधकामाच्या ८ कोटी ४३ लाख ४६ हजार एवढ्या रकमेच्या अंदाजपत्रक व नकाशांना प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. या प्रस्तावाला मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न आमदार सुभाष धोटे यांनी केले आहे. त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी ८ कोटी ४३ लाख ४६ हजार एवढ्या रकमेच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली आहे.
उपजिल्हा रुग्णालयासाठी लागणाऱ्या ८ कोटी रुपयाच्या आर्थिक प्रस्तावास मान्यता दिल्याचे आरोग्य सेवा संचालनालयाचे १४ जानेवारी २०१४ रोजी निगमीत करण्यात आलेले पत्र नुकतेच २ सप्टेंबर २०१४ रोजी प्राप्त झाले असुन लवकरच राजुरा येथे या उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू होणार आहे. सदर उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे खेचुन आणल्यात आमदार सुभाष धोटे यांनी शासन दरबारी पुर्ण ताकद पणाला लावली त्यामुळेच १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे साकार होत आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्र अतिदुर्गम व नक्षलग्रस्त असुन या क्षेत्रात एकही १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय नव्हते या उपजिल्हा रुग्णालयाच्या निर्मीतीमुळे संबंधीत कोरपना व जिवती तालुक्याचे रुग्णांनाही या उपजिल्हा रुग्णालयाचा लाभ मिळणार आहे. तसेच सिमेलगतच्या तेलंगाणा राज्यातील अनेक गावातील अनेक रुग्ण थेट चंद्रपूरला उपचारासाठी जात असतात त्यांनाही आता राजुरा येथे उपचार घेण्याची संधी या रुग्णालयामुळे मिळणार आहे.
राजुरा येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय निर्माण व्हावे आणि या परिसरातील नागरिकांची अनेक दिवसापासून मागणी होती. त्यामुळे आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्य सुदृढ राहावे, त्यांना योग्य वेळी उपचार मिळावा, छोट्या व्याधीसाठी चंद्रपूरला जावे लागु नये, याची दखल आमदार सुभाष धोटे यांनी घेतल्याने दिलासा मिळाला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Bhatipujan of Subdivision Hospital at Rajura, worth Rs 8 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.