शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

कधी मूर्त, कधी अमूर्त.. कधी दोन्हींचा सुंदर मिलाफ; भद्रावतीच्या 'या' कलाकाराची सातासमुद्रापार झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 14:13 IST

भद्रावतीचे कलाकार महेश मानकर यांनी आतापर्यंत २५ ते ३० देशांमध्ये कार्यशाळा आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय त्यांनी रशियामध्ये कार्यशाळा, मास्टर क्लासेस, ग्रुप आणि एकल कला प्रदर्शनांचे आयोजन केले आहे.

ठळक मुद्देसुमारे ३० देशांमध्ये महेशच्या कलाकृतीने केले भारताचे प्रतिनिधित्व

चंद्रपूर : महाराष्ट्रातील भद्रावती येथे बालपण घालवलेल्या महेश महादेव मानकर यांनी प्राचीन जैन मंदिरे, बौद्ध लेणी आणि शिव आणि विष्णू यांना समर्पित प्राचीन मंदिरांमध्ये केलेल्या आकृत्या आणि रंगसंगतीचा जो प्रभाव पडला होता, तो त्यांच्या कलाकृतींमध्ये दिसून येतो. एमएफए करून नागपूर विद्यापीठातून सुवर्णपदक मिळवलेल्या महेशचे परदेशातही कौतुक झाले.

आतापर्यंत त्यांनी २५ ते ३० देशांमध्ये कार्यशाळा आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय त्यांनी रशियामध्ये कार्यशाळा, मास्टर क्लासेस, ग्रुप आणि एकल कला प्रदर्शनांचे आयोजन केले आहे.

चित्र ही एक अशी अभिव्यक्ती आहे ज्याचे शब्द, रेषा आणि रंग आहेत आणि ते शब्द वाचून डोळे आणि मन कलेच्या प्रकाशाने चमकते. ज्या भावना कलाकार बोलून व्यक्त करू शकत नाहीत, त्यासाठी तो आकृत्यांची मदत घेतो. या आकृत्या कधी मूर्त, कधी अमूर्त तर कधी या दोन्हींचा सुंदर मिलाफ असते. गेल्या दोन दशकांपासून हा सुंदर संजोग आपल्या सर्जनशील कार्यात उतरवण्याचे काम भद्रावतीचे कलाकार महेश महादेव मानकर करत आहेत.

कलेचा संबंध मन आणि बुद्धी या दोन्हींशी असतो, ही गोष्ट त्यांच्या कामात स्पष्टपणे दिसून येते. ज्यामध्ये त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की एकतर व्यक्ती समाजाला मूर्ख बनवते किंवा इतरांना मूर्ख बनवते. पण या दोन्ही परिस्थिती शब्दात मांडता येणार नाहीत. मूर्खपणाचे हे नमुने कधी कॅनव्हासवर तर कधी ड्रॉइंग शीटवर या आकृत्यांमधून आणि रंगांनी व्यक्त होतात. किंबहुना त्यांची चित्रे सहन करण्यापासून ते सांगण्यापर्यंतच्या काळातील कथा आहेत.

त्यांनी याआधीच जलरंग कलाकाराची प्रतिमा आपल्या निर्मितीने मजबूत केली आहे. व आता ऍक्रेलिक, चारकोल आणि मिक्समीडियाच्या माध्यमातून निर्माण करून आणखी एक ओळख निर्माण करत आहे. एकेकाळी गुहांच्या भिंती आणि मंदिरांचे खांब सुशोभित करणाऱ्या त्या काळाची धूसर छापही त्याच्या कामात दिसते. आर्टमेटच्यावतीने या प्रतिभावंत कलाकार महेश मानकर याचे कौतुक करण्यात येत आहे.

टॅग्स :artकलाpaintingचित्रकलाSocialसामाजिक