शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हापासून सावधान

By admin | Updated: March 31, 2017 00:46 IST

चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना पुढील काही दिवस तीव्र उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.

! नागपूर वेधशाळेकडून सर्तकतेचा इशारा : दुपारी बाहेर पडू नका चंद्रपूर : चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना पुढील काही दिवस तीव्र उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. नागपूर वेध शाळेकडून यासंदर्भात सर्तकतेचा इशारा देण्यात आला असून चंद्रपूर शहर व जिल्ह्याच्या काही भागात उष्णतेची लाट पसरली आहे. पुढील चार दिवस तापमानाचा आलेख चढता राहणार आहे. त्यामुळे शक्यतो दुपारी घराबाहेर पडू नये, असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.दुपारच्या तीव्र उन्हात नागरिकांनी विशेषत: वृध्द व्यक्ती, लहान बालके, गरोदर माता व उन्हात काम करणाऱ्या कामगारांनी या काळात अधिक काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. चंद्रपूरमध्ये गेल्या वर्षी १७ ते १९ एप्रिल या काळात एकदा तर १५ ते २५ मे या काळात दुसऱ्यांदा उष्णतेची लाट पसरली होती. मात्र यावर्षी ४० च्यावर पारा मार्च महिन्यातच पोहचला असल्यामुळे नागरिकांनी उन्हापासून दूर राहणे योग्य आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा व महानगरपालिका आरोग्य यंत्रणेने जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघात झालेल्या रुग्णांसाठी विशेष कक्ष उभारला असून यंत्रणा सज्ज आहे. (स्थानिक प्रतिनिधी)उन्ह लागल्याची लक्षणे अचानक शरीरामध्ये अस्वस्थपणा जाणवणे, थकवा येणे, शरीर तापणे, डोकेदुखी वाढणे, मळमळ वाटणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. अशी लक्षणे जाणवल्यास मनपा आरोग्य केंद्र किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात तातडीने दाखल होऊन उपचार करावा. तसेच आकस्मिक परिस्थितीत १०८ या टोल फ्री क्रमांकावर संर्पक साधून आकस्मिक सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.उन्हापासून रक्षणासाठी हे करा उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजेच नियमित अंतराने मोठ्या प्रमाणात पाणी प्यावे. सायंकाळी थंड पाण्याने आंघोळ करावी. ताक, आंब्याचे पन्ह, नाराळाचे पाणी मोठ्या प्रमाणात सेवन करावे. सैल व फिक्कट रंगाचे कपडे घालावे. थंड जागेत किंवा वातावरणात राहावे. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उन्हात काम करण्याचे टाळावे, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.