शहरात उपाशी जगण्यापेक्षा गावी गेलेलं बरं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:27 IST2021-04-11T04:27:17+5:302021-04-11T04:27:17+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात उद्योगांची वाणवा आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार युवक रोजगाराच्या शोधात मोठ्या मोठ्या शहरात गेले आहेत. छोटे-मोठे काम करून ...

शहरात उपाशी जगण्यापेक्षा गावी गेलेलं बरं!
चंद्रपूर जिल्ह्यात उद्योगांची वाणवा आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार युवक रोजगाराच्या शोधात मोठ्या मोठ्या शहरात गेले आहेत. छोटे-मोठे काम करून आपली उपजीविका भागवत असतात. तर शेतीचा हंगाम संपल्यानंतर अनेक मजूर मिर्ची तोडण्यासाठी, कापूस वेचणीसाठी परराज्यात किंवा मोठ्या शहरात जातात. मागील वर्षी कोरोनामुळे या कामगारांचे तसेच बेरोजगारांचे मोठे हाल झाले होते. मध्यंतरी कोरोनाची स्थिती निवडल्यामुळे हे कामगार पुन्हा कामासाठी हैदराबाद, पुणे, अमरावती, मुंबई येथे गेले होते. मात्र रुग्णसंख्या वाढीस लागली आहे, त्यामुळे प्रशासनाने काही प्रमाणात निर्बंध लादले आहेत, तसेच शनिवार व रविववारला विकेंड लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे मागील वर्षीसारखी स्थिती उद्भवू नये, म्हणून कामगार पुन्हा गावाकडची वाट धरत आहेत.
बॉक्स
हैदराबाद मार्गावर सर्वाधिक गर्दी
चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश कामगार, बेरोजगार हैदराबाद येथे काम करण्यासाठी जात असतात. येथील छोट्या-मोठ्या कंपनीमध्ये काम करीत असतात; मात्र आता हे कामगार परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे, खासगी बस, एसटीमध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
शेतीचा हंगाम संपल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश शेतमजूर मिरची तोडणीसाठी किंवा कापूस वेचणीसाठी अमरावतीकडे जात असतात. आता लॉकडाऊनमुळे हे कामगार परत येत असताना दिसून येत आहेत.
कोट
हैदराबादला कंपनीत काम करीत होतो; परंतु आता पुन्हा लॉकडाऊन होण्यासारखी स्थिती दिसत असल्याने गावाकडे परत आलो आहे. गावातच कोणतेही छोटे-मोठे काम करून जीवन जगू.
- रघुनाथ गेडाम कामगार
मिरची तोडणीच्या कामासाठी अमरावती जिल्ह्यात गेलो होतो; परंतु लॉकडाऊन होणार, असे अनेक जण सांगत आहेत. त्यामुळे सगडे साहित्य घेऊन गावाकडे माघारी परतलो आहे.
प्रमोद राऊत, शेतमजूर.