शेती कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST2021-04-23T04:30:48+5:302021-04-23T04:30:48+5:30
बांधकाम साहित्य हटवावे चंद्रपूर : शहरातील काही वाॅर्डामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच बांधकाम साहित्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ...

शेती कामाला सुरुवात
बांधकाम साहित्य हटवावे
चंद्रपूर : शहरातील काही वाॅर्डामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच बांधकाम साहित्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे साहित्य हटवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जागेचे पट्टे नियमित करावे
चंद्रपूर : दिवसेंदिवस शहरातील लोकसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे नागरिक जागा मिळेल तिथे घर बांधून मोकळे होत आहे. तर काही ठिकाणी जागेचे पट्टे नियमित केले नसल्याने नागरिक घरकुलांपासून वंचित आहेत. त्यामुळे महापालिकेने घरकुलाचे पट्टे नियमित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
पाणी टंचाईने नागरिक त्रस्त
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. सध्या कोरोनाचे सावट आहे. त्यातच पाणीच मिळत नसल्याने त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
नियमित स्वच्छता करावी
चंद्रपूर : शहरातील बहुतांश नाल्यांमध्ये कचरा तुंबल्यामुळे या नाल्यांचे पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. त्यामुळे वाॅर्डनिहाय नाल्यांची स्वच्छता करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
डुकरांचा बंदोबस्त करावा
चंद्रपूर : शहरातील झोपडपट्टी परिसरातील काही भागामध्ये मोकाट डुकरे फिरत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पाणपोई सुरू करावी
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून उन्ह सारखे वाढत आहे. त्यातच संचारबंदी असल्यामुळे सर्वच बंद आहे. परिणामी शहरात येणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. महापालिकेने चौका-चौकात पाणपोई सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा
चंद्रपूर : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. घराबाहेर निघणे कठीण झाले. शहरातील अनेक वाॅर्ड आणि मुख्य चौकात कुत्र्यांचा संचार वाढला. त्यामुळे बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
मोकळ्या जागांचा विकास करा
चंद्रपूर : महानगरपालिकेने शहरातील मोकळ्या जागेचा विकास करावा, अशी मागणी केली जात आहे. दोन वर्षापूर्वी काही ठिकाणी खेळण्याचे तसेच व्यायामाचे साहित्य लावून विकास केला होता. त्यामुळे शहरातील ओपन स्पेसचा विकास करण्याची मागणी केली जात आहे.
भिवापूर वॉर्डातील रस्त्याची दुरवस्था
चंद्रपूर : येथील भिवापूर तसेच परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून मोठ्या संख्येने रेलचेल असते; मात्र त्रास सहन करावा लागणार आहे. महानगरपालिकेने याकडे विशेष लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
प्रदूषणावर आळा घालावा
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पांतून निघणाऱ्या धुरांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहे. त्यामुळे या प्रदूषणाच्या समस्येवर लवकरात लवकर आळा घालण्याची मागणी चंद्रपुरातील नागरिकांनी केली आहे.
सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
चंद्रपूर : कोरपना व गडचांदूर येथे मार्केट यार्डमध्ये शेतकरी मोठ्या संख्येने धान्य विक्रीसाठी येतात. मात्र या ठिकाणी शेतकरी व जनावरांची प्रचंड गैरसोय होत आहे. कोरपना येथे दर शुक्रवारी, तर गडचांदूर येथे मंगळवारी आठवडी बाजार भरतो. संचारबंदीमुळे हा बाजार सद्य स्थितीत बंद आहे.
रस्त्यावरील मातीमुळे अपघाताची शक्यता
चंद्रपूर : शहरातील बहुतांश सिमेंट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती साचली आहे. त्यामुळे माती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे.
मजुरांमध्ये पुन्हा नैराश्य
चंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामाच्या माध्यमातून नोंदणीकृत मजुरांना काम उपलब्ध करून दिले जाते. यातून रोजगार प्राप्त होत असतो. परंतु सध्या काही ठिकाणी ही कामे बंद आहेत. त्यामुळे मजुरांमध्ये नैराश्य पसरले आहे.
थकित अनुदान त्वरित द्यावे
चंद्रपूर : आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी समाजकल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन योजना शासनाकडून राबविली जाते. यासाठी अनेकांनी अर्ज केले आहेत. मात्र, विभागाकडे निधी नसल्याने लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत.
प्रकरणांचा निपटारा करावा
चंद्रपूर : चंद्रपुरातील जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांकडे चंद्रपूरसह अन्य तीन जिल्ह्यांचा प्रभार देण्यात आला आहे. यासह संशोधन अधिकाऱ्यांकडेसुद्धा चंद्रपूर व गडचिरोली समाजकल्याण विभागाचा प्रभार असल्याने मोठ्या प्रमाणात कामाचा ताण वाढला आहे. परिणामी जात पडताळणीची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत.