शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात बीड, रायगडचे पोलीस राज्यात प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 13:24 IST

पोलीस तपासाला मदतीसाठी क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम (सीसीटीएनएस) सुरू करण्यात आली आहे.

परिमल डोहणे -चंद्रपूर : तंत्रज्ञानाच्या युगात पोलीस विभागाला ऑनलाइन करण्यासाठी राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) सीसीटीएनएस प्रणालीची अंमलबजावणी केली. गुन्हेगारांची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी ही प्रणाली पोलिसांना फायदेशीर आहे. या प्रणालीचे मे महिन्यात मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये चंद्रपूर पोलिसांनी २४२ पैकी २२७ गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांकाची रँकिंग पटकावली असून, चंद्रपूर पोलिसांचे नाव उज्ज्वल केले आहे. यात पहिली रँकिंग बीडरायगडने पटकावली आहे. ऑनलाइन युगात पोलीस विभागही ऑनलाइन झाला आहे. कुठेही कोणतीही घटना घडली किंवा कोणत्याही ठाण्यांतर्गत गुन्हा नोंद झाला, तर त्याची माहिती सीसीटीएनएस प्रणालीवर ऑनलाइन पद्धतीने भरली जाते. सीसीटीएनएस प्रणाली संपूर्ण देशात अवलंबविण्यात आली आहे. या प्रणालीअंतर्गत आयसीजेएस पोर्टल लिंक करण्यात आले आहे. या पोर्टलच्या आधारावर पोलीस विभाग कोणत्याही गुन्हेगाराची पार्श्वभूमी क्षणात बघू शकतात. त्याच्यावर कोणत्या ठिकाणी किती गुन्हे आहेत. याबाबतही त्यांना माहिती मिळते. मे महिन्यात याचे मूल्यांकन करण्यात आले. यात पहिला क्रमांक बीडरायगड, दुसरा क्रमांक चंद्रपूर, औरंगाबाद ग्रामीण, जालना यांनी पटकावून आपले नाव राज्यात चमकाविले आहे.

काय आहे सीसीटीएनएस प्रणाली? पोलीस तपासाला मदतीसाठी क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम (सीसीटीएनएस) सुरू करण्यात आली आहे. यात कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती अद्ययावत केली असते. प्रथम खबरी अहवाल अर्थात एफआयआर ते आरोपपत्र दाखल होईपर्यंत इत्थंभूत माहितीचा यात समावेश होतो. गुन्ह्याचा तपास, घटनास्थळ, अटक मुद्देमाल जप्त अशी माहिती असते.

तीन महिने साइटवर असते एफआयआर- कुठेही कोणतीही घटना घडली तरीही त्याची माहिती सीसीटीएनएस प्रणालींतर्गत किमान ४८ तासांच्या आत ऑनलाइन अपलोड केली जाते. साधारणत: ती एफआयआर तीन महिने या साइटवर असते. - सिटिझन डॉट महापोलीस डॉट जीओव्ही डॉट इन या साइटवर सर्वसामान्य नागरिकसुद्धा एफआयआरची पाहणी सहज करू शकतात. महिला विरोधातील अत्याचारविरोधातील तक्रारी सोडून सर्वच एफआयआर येथे पाहता येऊ शकते. 

टॅग्स :PoliceपोलिसBeedबीडRaigadरायगडBeed policeबीड पोलीस