इरई नदीकाठाचे होणार सौंदर्यीकरण

By Admin | Updated: February 25, 2017 00:36 IST2017-02-25T00:36:52+5:302017-02-25T00:36:52+5:30

ईरई नदीच्या काठाचे सौदर्यीकरण केले जात आहे. आगामी काळात नागरिकांसाठी तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

Beautification of the river will be done | इरई नदीकाठाचे होणार सौंदर्यीकरण

इरई नदीकाठाचे होणार सौंदर्यीकरण

सुधीर मुनगंटीवार : चंद्रपूर शहर विकास कामात आघाडी घेणार
चंद्रपूर : ईरई नदीच्या काठाचे सौदर्यीकरण केले जात आहे. आगामी काळात नागरिकांसाठी तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्या सौदर्यीकरण कामाचे भूमिपूजन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटीबध्द असून शहराला विकासाच्या दृष्टीने सर्वच बाबतीत पुढे नेण्याची ग्वाही दिली.
ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे भूमिपुजन व लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलते होते. कार्यक्रमाला पालकमंत्र्यांसह आ. नाना शामकुळे, महापौर राखी कंचलार्वार, उपमहापौर वसंत देशमुख, मनपा आयुक्त संजय काकडे, सभापती एस्टर सिरवार आदी उपस्थित होते.
ईरई नदीच्या सौंदर्यीकरणासह इरई नदी ते वडगांवपर्यंत ऊर्जा बचत व नवीन आधुनिक पध्दतीने उभारण्यात येत असलेल्या पथदीवे उभारणाचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावर ८१ लाख ७२ हजार रुपये खर्च करण्यात येत आहे. तसेच डस्टबीन वाटप व लोकार्पण सोहल्यानंतर पाच देऊळ येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते जटपुरागेट ते रामाळा तलाव ते पाच देऊळ ते बगड खिडकी रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यावर ४ कोटी ८४ लाख रुपये खर्च करून हा रस्ता करण्यात आला.
कोनेरी स्टेडियम येथे ६० लाख रुपए खर्च करून होत असलेल्या नूतनीकरण कामाचा पालकमंत्र्यांनी शुभारंभ केला. त्यानंतर त्यांनी ४१ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या रय्यतवारी प्रभागामध्ये बायपास रोड ते समाज भवन ते लव इंडिया आर्गनायझेशन चर्चपर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन, वाहतूक नियंत्रण कार्यालयाजवळील १ कोटी ४४ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजनही केले.
वाहतूक नियंत्रण कार्यालयाजवळ पथदिवे उभारणी कामाचे भूमिपूजन करण्यात आले. ३१ लक्ष रुपए पथदिव्यांवर खर्च होणार आहे. जयका आॅटो ते भागवत आर्केडपर्यंतसुध्दा सदर पथदीवे बसविले जात असून ५९ लाख ४७ हजार रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन झाले. जुना वरोरा नाका ते पोस्ट आॅफिसपर्यंत पथदीवे बसविण्यात येत आहे.
नागपूर रोड येथे कॉ.धांडे यांच्या घरासमोरील खुल्या जागेचा विकास केला जात आहे. त्या ४० लाख ३७ हजार रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच जटपुरा गेट ते इंदिरा गांधी पुतला दरम्यान बसविण्यात येत असलेल्या एलईडी पथदिव्यांच्या कामांचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. (प्रतिनिधी)

आझाद बागेत जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित
मौलाना अब्दुल कलाम आझाद बागेतील जलशुध्दीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्र्यांनी भूमिपूजन व लोर्कापण केलेली काही कामे महानगरपालिका निधीतून, काहीकामे मागासक्षेत्र अनुदान निधीतून आणि काही कामे ना. मुनगंटीवार यांच्या विशेष निधीतून केली जात आहे.

Web Title: Beautification of the river will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.