शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

देशातील नामवंत मंदिराला शोभेल असे महाकाली मंदिराचे सुशोभीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 22:45 IST

देशातील नामवंत मंदिरांना शोभेल अशा पद्धतीचे माता महाकाली मंदिराचे सुशोभीकरण होणार आहे. यासाठी नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत. त्यांच्या सूचनेनुसार आराखड्यात बदल करण्यात येईल. सर्वाच्या मान्यतेचे हे मंदिर असेल, असे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : महाकाली मंदिराच्या विकास आराखड्याचे नागरिकांकडून स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशातील नामवंत मंदिरांना शोभेल अशा पद्धतीचे माता महाकाली मंदिराचे सुशोभीकरण होणार आहे. यासाठी नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत. त्यांच्या सूचनेनुसार आराखड्यात बदल करण्यात येईल. सर्वाच्या मान्यतेचे हे मंदिर असेल, असे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.एखाद्या वास्तू संदर्भात मनात आराखडे तयार करावे आणि ती कल्पनेपेक्षा प्रत्यक्षात अधिक आकर्षक दिसावी, अशा उस्फुर्त प्रतिक्रिया गुरुवारी चंद्रपूरवासीयांनी महाकाली मंदिराच्या विकास आराखड्याबद्दल व्यक्त केल्या. चंद्रपूरसह व विदर्भ मराठवाडयातील नागरिकांची अराध्यदैवत असणाऱ्या माता महाकालीच्या मंदिराच्या सुशोभीकरणाचा आराखडा गुरुवारी सायंकाळी राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेच्या दरबारात मांडला. पुढील काही दिवसात या आराखड्यासंदर्भात जनतेच्या सूचना, मते मागविण्यात आले आहे.माता महाकाली देवस्थान विकास परिषदेच्या आयोजनात पुणे येथील एका प्रतिष्ठित संस्थेने तयार केलेल्या आराखड्याला सादर करण्यात आले. हा आराखडा बघण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात व शहरातील सर्व नागरिकांना निमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये विविध मंदिराचे ट्रस्टी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग होता. मूळ मंदिराच्या गाभ्याला कुठलाही हात न लावता मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ तसेच भाविकांच्या राहण्याची उत्तम सोय करण्यात येणार आहे.मंदिर विकासात सर्वांचे मत जाणणारदेशविदेशात व देशातील अनेक पर्यटनस्थळाच्या विकासासाठी निधी देत असताना आपली स्वत:ची श्रद्धा असणाऱ्या महाकाली मंदिराच्या सुशोभीकरणाचा अनेक दिवसांचा प्रस्ताव मनात होता. त्यामुळे या परिसराचे सुशोभीकरण करताना मंदिराचे ट्रस्टी, या ठिकाणी असणारे दुकानदार व या परिसरातील नागरिक तसेच महाकाली मातेवर श्रद्धा असणाऱ्या भाविकांचे मत जाणून घ्यावे, यासाठी या सादरीकरणाचे हे आयोजन करण्यात आले, अशी माहिती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.नागरिकांना तयार करण्यात आलेला आराखडा मान्य नसेल तर त्यांच्या सूचनेनुसार त्यामध्ये बदल करण्यात येईल. त्यांना हा आराखडाच नको असेल तर तो रद्द देखील करण्यात येईल. तथापि, या मंदिराचे सुशोभिकरण करताना येणाºया भाविकांनी शहराची सकारात्मक प्रतिमा सोबत घेऊन जावी. हा आपला यामागील उद्देश असून त्यामुळे अशा प्रकारच्या कामांमध्ये प्राविण्य असणाºया संस्थेला यासंदर्भातील आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले. हा आराखडा सर्वच दृष्टीने दर्जेदार राहणार,असेही त्यांनी स्पष्ट केले.या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर उपस्थित होते.सर्वांच्या मान्यतेनेच अंतिम स्वरुपघरातील दुकानदारांनी आपल्या व्यवसायावर परिणाम होईल का किंवा त्यात काही बदल हवा असल्यास तेदेखील त्यांनी सुचवावे, असे ते म्हणाले. यावेळी नागरिकांसाठी सूचना पेटी ठेवण्यात आली होती. शहरातील अनेक नागरिकांनी लेखी सूचना यामध्ये टाकल्या. या सूचनांचा अभ्यास समिती करणार असून त्यानंतर या आराखड्याला सर्वांच्या मान्यतेने अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.