जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST2021-02-05T07:42:45+5:302021-02-05T07:42:45+5:30
हर्ष गिरडकर हा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यासाठी गेला. यावेळी डॉक्टरांनी त्याला रिपोर्ट आणायला सांगितले. हर्ष रिर्पाट घेऊन आला ...

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण
हर्ष गिरडकर हा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यासाठी गेला. यावेळी डॉक्टरांनी त्याला रिपोर्ट आणायला सांगितले. हर्ष रिर्पाट घेऊन आला तेव्हा डॉक्टर इतर रुग्ण तपासत होते. तसेच त्यांच्या कक्षाबाहेर रुग्णांची रांग लागली. यावेळी त्या कक्षाबाहेर असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्याला रांगेत लागण्यास सांगितले. मात्र हर्ष ऐकत नव्हता. यावेळी त्या दोघांची बाचाबाची झाली. हर्षने घरी जाऊन याबाबत आपल्या वडिलांना माहिती दिली. त्यानंतर त्याचे कुटुंबच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. व त्या कंत्राटी कर्मचाऱ्याशी वाद घालून मारहाण केली. अशी तक्रार कौशल्या लहू संगेल (४५) यांनी शहर पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चारही जणांवर कलम ३५३, ५०४, ५०६ (३४) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश मेश्राम करीत आहेत.