माॅर्निंग वाॅकला गेलेल्या नागरिकांवर अस्वलाचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:27 IST2021-03-06T04:27:13+5:302021-03-06T04:27:13+5:30

चंद्रपूर : शहरातील पठाणपुरा गेट ते माना टेकडी मार्गावरील जेमनजेट्टी दर्ग्याच्या मागे वेकोलीच्या ओव्हरबर्डनजवळ शुक्रवारी सकाळी अचानक अस्वलाने हल्ला ...

Bear attack on civilians walking the Morning Walk | माॅर्निंग वाॅकला गेलेल्या नागरिकांवर अस्वलाचा हल्ला

माॅर्निंग वाॅकला गेलेल्या नागरिकांवर अस्वलाचा हल्ला

चंद्रपूर : शहरातील पठाणपुरा गेट ते माना टेकडी मार्गावरील जेमनजेट्टी दर्ग्याच्या मागे वेकोलीच्या ओव्हरबर्डनजवळ शुक्रवारी सकाळी अचानक अस्वलाने हल्ला करून दोघांना जखमी केले. सुनील लेनगुरे (रा. भिवापूर वार्ड) व महादेव गुंडेट्टवार हे दोघांना जखमी केले. सुनील लेनुगरे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चंद्रपूरच्या पठाणपुरा परिसरातील नागरिक सकाळी पठाणपुरा गेट बाहेर माॅर्निंग वाॅकला जातात. दरम्यानच्या काळात जेमनजेट्टी दर्ग्याच्या मागील बाजूला वेकोलीच्या ओव्हरबर्डनजवळ सुनील लेनगुरे व महादेव गुंडावार हे प्रात:र्विधीकरिता गेले असता अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला करून जखमी केले, अशी माहिती चंद्रपूर वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी कारेकर यांनी दिली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, अस्वलाने माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या नागिरकांवर हल्ला केला. यामुळे या परिसरात अस्वलाची दहशत पसरली आहे. चंद्रपूर वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी कारेकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अधिक तपास सुरू आहे.

बाॅक्स

मागील काही दिवसांपासून अस्वलाची दहशत

घटनास्थळाला लागूनच असलेल्या लालपेठ काॅलरी परिसरात मागील काही दिवसांपासून अस्वल फिरत आहे. या भागात बिबटही आहे. मात्र, अस्वलाची दहशत वाढत असल्याने तिला बेशुद्ध करून पकडण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून वनविभाग करीत आहे. अशातच आज या परिसरापासून काही अंतरावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली. असेही चंद्रपूर वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी कारेकर यांनी सांगितले.

Web Title: Bear attack on civilians walking the Morning Walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.