शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! वैधता संपलेल्या सिलिंडरपासून धोका

By admin | Updated: April 1, 2016 01:24 IST

ग्राहक जागृतीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत आहेत. मात्र, असे असतानाही काही बाबी यातून सुटताना दिसतात. दैनंदिन वापरातील

अनेक ग्राहक अनभिज्ञ : ‘एक्सपायरी डेट’ सिलिंडर ठरू शकतो धोकादायक चंद्रपूर : ग्राहक जागृतीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत आहेत. मात्र, असे असतानाही काही बाबी यातून सुटताना दिसतात. दैनंदिन वापरातील घरगुती सिलिंडरच्या बाबतीत ग्राहकांत कमालीची अनभिज्ञता दिसून येते. प्रत्येक वस्तुची कालमर्यादा ठरलेली असून सिलिंडरलाही ती आहे, ही बाब कुणीच गंभीरतेने घेत नाही. आॅईल कंपन्यांपासून वितरकांपर्यंत सर्वांचेच याकडे दुर्लक्ष होत असून पुरवठा विभागाच्याही अखत्यारितील ही बाब नाही. यामुळे ग्राहकांनी जागरूकता बाळगणे गरजेचे झाले आहे.दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक बाब झालेल्या सिलिंडरचा पुरवठा आणि वापराबाबतचे नियम ग्राहकांना माहितीच असेल याची शाश्वती नाही. या नियमांबाबत ग्राहकांना माहिती देण्याचे काम गॅस कंपन्यांचे आहे. मात्र याची अंमलबजावणी कितपत होते, यावर प्रश्नचिन्ह उभे राहते. सिलिंडरला ‘एक्सपायरी डेट’ असते, हे अनेकांना माहितीच नाही. जिल्ह्यात गॅसधारकांची संख्या लाखोंवर आहे. प्रत्येक उत्पादनाला जशी निर्मितीची तारीख असते तसेच ते उत्पादन किती दिवसांपर्यंत वापरण्यायोग्य आहे, याचाही अवधी ‘त्या’ उत्पादनावर नोंदविलेला असतो. घरगुती आणि व्यावसायिक वापरात असलेल्या गॅस सिलिंडरच्या बाबतीतही असेच आहे. गॅस सिलिंडरच्या बाबतीत सुरक्षेचे काही मापदंड आहेत. वितरक आणि गॅस एजन्सीच्या भाषेत सिलिंडरची ‘एक्सपायरी डेट’ यालाच ‘ड्यू फॉर फिलिकल टेस्टिंग’ असे म्हणतात. परंतु, सर्वसामान्यांच्या भाषेत याला ‘एक्सपायरी डेट’ असेच म्हणतात. नवीन सिलिंडर घरी किंवा व्यवसायासाठी आणल्यानंतर त्याची पुर्नतपासणी करून घेतल्यास भविष्यात होणारा अपघात टाळता येईल. मात्र, शहरी व ग्रामीण भागात याविषयी अनभिज्ञता असून जागृतीची गरज आहे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी आर. एस. आळे यांच्याशी संपर्क साधला असता, संर्पक होऊ शकला नाही. (स्थानिक प्रतिनिधी)