शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

चंद्रपुरातील ३० टक्के घरात आढळली डेंजर डासांची अंडी; पावसाळ्यात जलजन्य आजारांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2022 17:16 IST

मनपा आरोग्य पथकाकडून १० हजार ८८५ घरांची तपासणी

चंद्रपूर : डेंग्यू व इतर कीटकजन्य आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत घरोघरी केल्या जाणाऱ्या कंटेनर सर्वेक्षणात ३० टक्के घरांमध्ये डासांची अंडी आढळली आहेत. आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. डेंग्यू व इतर कीटकजन्य आजार पसरू नयेत, या दृष्टीने मनपा प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. मात्र, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मनपा आरोग्य विभागामार्फत एमपीडब्लू, एनएम व आशा वर्करद्वारा डासअळी उगमस्थाने शोधून नष्ट करण्यासाठी कंटेनर सर्वेक्षण राबविला जात आहे. सर्वेक्षणअंतर्गत आतापर्यंत १० हजार ८८५ घरांची तपासणी करण्यात आली. यात ३० टक्के घरांत डासांची अंडी आढळली आहेत. हे प्रमाण मोठे असल्याने सर्वांनीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. डेंग्यूचा डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो. त्यामुळे आपल्या घराची तपासणी करा. कूलर, टायर, भंगारातील वस्तू, डबे यात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्या. पाणी साठवण्याची भांडी कोरडी करा, डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाका. पाणी साठा मोठा असले, तर त्यात गप्पी मासे टाका. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी खाऊन टाकतात, ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो.

डेंग्यू हा जीवघेणा आजार असल्याचे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे डासवाढीला प्रतिबंध हाच सर्वात उत्तम उपाय आहे. डेंग्यू रोगासंदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेने केले.

आजार अंगावर काढू नका

  • शिळे किंवा उघड्यावरचे माश्या बसलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत. अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत.
  • हातगाड्यावर, उघड्यावर विकले जाणारे खाद्य पदार्थ खाऊ नयेत.

पावसाळ्यात आजार अंगावर काढू नका, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

शुद्ध न केलेले पाणी वापरू नका

मनपाच्या नळावाटे होणाऱ्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा. बोअरवेल, कॅनॉल, शुद्धीकरण न केलेल्या विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये. शाळा, महाविद्यालयांना पुरविण्यात येणारे टाकी, पंपवेलची सफाई करावी. प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे. उलट्या-जुलाब, विषमज्वर वैगेर विकार झाल्यास वेळीच उपचार करावा.

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यूchandrapur-acचंद्रपूर