सावधान ! ११ कोरोना बाधित आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:28 IST2021-09-11T04:28:19+5:302021-09-11T04:28:19+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात गणेशोत्सवाची तयारी सुरू असतानाच शुक्रवारी ११ जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर एक कोरोनामुक्त झाला. गणेशोत्सवामुळे आजपासून ...

Be careful! 11 corona were found infected | सावधान ! ११ कोरोना बाधित आढळले

सावधान ! ११ कोरोना बाधित आढळले

चंद्रपूर : जिल्ह्यात गणेशोत्सवाची तयारी सुरू असतानाच शुक्रवारी ११ जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर एक कोरोनामुक्त झाला. गणेशोत्सवामुळे आजपासून गर्दी उसळणार असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाला आहे.

बाधित आलेल्या ११ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ६,बल्लारपूर २, चिमूर २ व वरोरा तालुक्यातील एका रूग्णाचा समावेश आहे.

चंद्रपूर तालुका, भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल , सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यात एकही रूग्ण आढळला नाही. जिल्ह्यात बाधितांची संख्या ८८ हजार ६८२ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार १०४ झाली आहे. सध्या ३८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख ८२ हजार ५९१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख ९२ हजार ३६४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५४० बाधितांचे मृत्यू झाले आहे. कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: Be careful! 11 corona were found infected