डाकघरातून चोरट्यांनी पळवल्या बॅटऱ्या; एलसीबीने तिघांना ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2023 20:43 IST2023-06-09T20:43:14+5:302023-06-09T20:43:37+5:30
Chandrapur News चंद्रपूर डाकघरातून यूपीएस यंत्रणेच्या एकूण ३५ एसएमएफ एएच बॅटऱ्या चोरीला गेल्याची तक्रार प्रभारी डाकपालांनी रामनगर ठाण्यात केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून तीन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून बॅटऱ्या हस्तगत केल्या आहेत.

डाकघरातून चोरट्यांनी पळवल्या बॅटऱ्या; एलसीबीने तिघांना ठोकल्या बेड्या
चंद्रपूर : चंद्रपूर डाकघरातून यूपीएस यंत्रणेच्या एकूण ३५ एसएमएफ एएच बॅटऱ्या चोरीला गेल्याची तक्रार प्रभारी डाकपालांनी रामनगर ठाण्यात केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून तीन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून बॅटऱ्या हस्तगत केल्या आहेत. शुभम अमर समुद (२६), करण मुन्ना समुंद (२६), सनी अनिल किनवरिया (२७) तिघेही राहणार पंचशील चौक घुटकाला वॉर्ड चंद्रपूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
८ जून रोजी चंद्रपूरचे प्रभारी डाकपाल प्रधान डाकघर प्रोवंश दिनबंधू सरकार यांनी रामनगर पोलिस स्टेशनमध्ये ३ जून रोजी चंद्रपूर डाकघरातून यूपीएस यंत्रणेच्या एकूण ३५ एसएमएफ ४२ एएच बॅटऱ्या सुमारे एक लाख १८ हजार रुपये किमतीच्या चोरीला गेल्याची तक्रार केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी विशेष पथक गठित केले.
तपासादरम्यान वरील तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी बॅटऱ्या चोरी करून झुडपात लपवून ठेवल्याचे पोलिसांसमोर कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून विविध कंपनीच्या यूपीएस यंत्रणेच्या एकूण १९ एसएमएफ ४१ एएच बॅटऱ्या एकूण ७२ हजार ८१० रुपये किंमतीच्या जप्त केल्या. ही कारवाई एलसीबीचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलिस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोहवा संजय आतकुलवार, नितीय रायपुरे, प्रांजल झिलपे, गोपाल आतकुलवार आदींनी केली.