बँक आॕफ महाराष्ट्र १० दिवसापासून बंद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:30 IST2021-04-28T04:30:54+5:302021-04-28T04:30:54+5:30

नागभीड - येथील बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा गेल्या १० ते १२ दिवसापासून बंद असल्याची माहिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या ...

Bank of Maharashtra closed for 10 days? | बँक आॕफ महाराष्ट्र १० दिवसापासून बंद?

बँक आॕफ महाराष्ट्र १० दिवसापासून बंद?

नागभीड - येथील बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा गेल्या १० ते १२ दिवसापासून बंद असल्याची माहिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या या बंदमुळे सामान्य व गरीब खातेदार चांगलेच अडचणीत आले आहेत.

येथे बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा दहा वर्षांपूर्वी सुरू झाली. अल्पावधीतच या बँकेने ग्राहकांचा चांगलाच गोतावळा जमविला. हजारोच्या घरात या बँकेचे ग्राहक आहेत. या ग्राहकांमध्ये सर्वच स्तरातील लोक आहेत. मात्र या ग्राहकांना आता बँकेच्या धोरणामुळे समस्यांना सामोो जावे लागत आहे.

गेल्या १० ते १२ दिवसापासून बँक बंद असल्याने रोज शेकडो ग्राहक दुःखी अंत:करणाने आल्यापावली परत जात आहेत.

Web Title: Bank of Maharashtra closed for 10 days?