लाखो रुपयांच्या खत, बियाण्यांच्या विक्रीवर बंदी
By Admin | Updated: July 2, 2014 23:16 IST2014-07-02T23:16:37+5:302014-07-02T23:16:37+5:30
नियमांची पायमल्ली करीत खते व बियाण्यांंची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करणे कृषी विभागाने सुरू केले आहे. आतापर्यंत राजुरा तालुक्यातील पाच कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली.

लाखो रुपयांच्या खत, बियाण्यांच्या विक्रीवर बंदी
कृषी विभागाची कारवाई : विविध पाच केंद्राचा समावेश
चंद्रपूर : नियमांची पायमल्ली करीत खते व बियाण्यांंची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करणे कृषी विभागाने सुरू केले आहे. आतापर्यंत राजुरा तालुक्यातील पाच कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली. यात ३६ लाखांचे खत, बियाण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. कृषी अधिकारी आर.आर. राठोड यांनी ही कारवाई केली.
कारवाई करण्यात आलेल्या कृषीकेंद्रात चांडक ट्रेडर्स, रोहित अॅग्रो, साईराम कृषीकेंदम अहेरी, साईबाबा कृषी केंद्र गोवरी, वैष्णवी कृषी केंद्र भुरकुंडा बूज यांचा समावेश आहे. कृषी केंद्रावर होत असलेल्या बियाण्यांच्या काळया बाजारावर आळा घालण्यासाठी कृषी विभागाने काही कृषीकेंद्रावर छापा टाकला. यात कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या बियाण्यांच्या स्टॉकवर विक्रीबंदीचे आदेश दिले. तालुक्यात ९४ परवानाधारक कृषी केंद्रे आहेत. यात ७५ बियाणे कृषी केंद्रे, ८८ खतांची कृषी केंद्रे सुरू आहेत. किटकनाशक विक्रीसाठी ८१ परवानाधारक आहेत. यापैकी ६९ विक्री केंद्रे सुरू आहेत. तालुक्यात युरिया खताची १ हजार ६५६ मेट्रीक टन विक्री झाली. डीएपी खताची ७२० मे. टन विक्री झाली. तालुक्यात कापूस बियाण्यांच्या ८५ हजार ६१९ बॅग उपलब्ध झाल्या. यात ३९ हजार ४०७ पाकिटांची विक्री झाली आहे. सोयाबीन बियाणे ७ हजार ७२ क्विंटल उपलब्ध आहे. यापैकी ५ हजार ८३४ क्विं. बियाण्यांची विक्री झाल्याची माहिती राठोड यांनी दिली. (नगर प्रतिनिधी)