बाळू धानोरकर यांचा वरोऱ्यात सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:36 IST2019-05-27T00:36:06+5:302019-05-27T00:36:28+5:30
वरोरा शहर व तालुका काँग्रेस कमेटीतर्फे गांधी चौकात नवनिर्वाचित खासदार बाळू धानोरकर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विविध पक्षांचे पदाधिका उपस्थित होते.

बाळू धानोरकर यांचा वरोऱ्यात सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा: वरोरा शहर व तालुका काँग्रेस कमेटीतर्फे गांधी चौकात नवनिर्वाचित खासदार बाळू धानोरकर यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे, कॉंग्रेस नेते डॉ. विजय देवतळे, प्रदेश कॉंग्रेस सचिव आसावरी देवतळे, माजी जिल्हा परिषद सभापती प्रकाश मुथा, बाजार समीतीचे सभापती विशाल बदखल, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, डॉ. हेमंत खापने, कांँग्रेसचे तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, सुनंदा जिवतोडे, कन्हैयालाल जैस्वाल, विठ्ठल टाले, भगतसींग मालुसरे, चिंतामण आत्राम यांच्यासह विलास नेरकर, गजानन मेश्राम, राजू चिकटे, राजू महाजन, मनिष जेठानी, राहुल खारकर, सिध्दार्थ सुमन आदी विविध पक्षांचे पदाधिका उपस्थित होते.
याप्रसंगी खा.सुरेश धानोरकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी, समाजिक संघटना यांनीही त्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी शहरातील मुख्य मार्गावरुण मिरवणूक काढण्यात आली. स्वागत सभा व मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.