बल्लारपुरा ३१ डिसेंबरची रात्र शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST2021-01-02T04:24:32+5:302021-01-02T04:24:32+5:30

पोलिसांनी नगर परिषदजवळ व गोल पुलाजवळ नाकेबंदी करून युवकांना समज दिली. ५०च्या जवळपास चारचाकी गाड्यांची तपासणी केली, तर काही ...

Ballarpura The night of December 31 was peaceful | बल्लारपुरा ३१ डिसेंबरची रात्र शांततेत

बल्लारपुरा ३१ डिसेंबरची रात्र शांततेत

पोलिसांनी नगर परिषदजवळ व गोल पुलाजवळ नाकेबंदी करून युवकांना समज दिली. ५०च्या जवळपास चारचाकी गाड्यांची तपासणी केली, तर काही मद्यपींवर १८५ कलमान्वये कारवाई करण्यात आली. ३१ डिसेंबरची रात्र शांततापूर्वक गेल्याबद्दल पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

बॉक्स

जखमी व्यक्तीला दवाखान्यात पोहोचविले

दहेली ते आष्टी चौपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान त्या रस्त्यावर कळमनाजवळ डोक्याला मार लागलेला एक दुचाकीस्वार अंधारात तडफडत पडलेला दिसला. त्याची गंभीर स्थिती पाहून पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी तत्काळ त्याला सरकारी दवाखान्यात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचारानंतर त्याला चंद्रपूरला रेफर करण्यात आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे गोंडपिपरीच्या ठाकूर नावाच्या इसमाचे प्राण वाचले.

Web Title: Ballarpura The night of December 31 was peaceful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.