Ballarpur will have abundant water supply | बल्लारपूरला मुबलक पाणी पुरवठा होणार

बल्लारपूरला मुबलक पाणी पुरवठा होणार

ठळक मुद्दे९ कोटी ४० लाखांची तरतूद : वर्धानदी पात्रात रेडियल वेल कामाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर: येथील जीवन प्राधिकरणाकडून वर्धा नदीच्या पात्रात रेडियम वेल (पुरवठा विहिर) खोदण्यात येत आहे. या विहिरीच्या कामाला प्रारंभ झाला असून येत्या दीड वर्षात कामपूर्ण होणार असून यावर एकूण ९ कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
सद्यास्थितीत येथील जीवन प्राधिकरण केंद्राला वर्धा नदीच्या पात्रातील तीन खुल्या विहिरीतून पाणी पुरवठा होतो. उन्हाळ्यात पात्रातील पाणी कमी झाले की, दोन विहिरी कोरड्या पडतात. त्यानंतर केवळ एकाच विविहीरीद्वारे पाणी पुरवठा होतो. यामुळे शहरात पाणी टंचाई होते. गेल्या अनेक वर्षांपासून कमी अधिक प्रमाणात पाणी टंचाईची झळ येथील नागरिकांना बसत आहे. यावर उपाय, तसेच शहराचा होत असलेला विस्तार लक्षात घेऊन रेडियल वेल खोदण्याचा निर्णय घेण्याता आला आहे.
महाराष्ट्र सूवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत बल्लारपूर पाणी पुरवठा योजना टप्पा २ अंतर्गत हे काम होत असून ही रेडियल वेल नदीच्या तिरापासून १५० मीटर आत, नदीच्या पात्राच्या मध्यभागी असणार आहे. ही विहिर जमिनीच्या १० मीटर खोल राहणार असून जमिनीच्या वर २४ मीटर उंच राहणार आहे. रेडियल वेलमध्ये पाणी झऱ्यातून मिळत राहील. यामुळे ते मुळातच शुद्ध राहणार असल्याने जीवन प्राधिकरणाचा जलशुद्धीकरणावरचा खर्च कमी होणार आहे. याची पाणी साठवणूकीची क्षमता दर दिवशी तीन कोटी लीटर एवढी राहील. सध्याच्या व्यवस्थेत ती एक कोटी आहे. यावरुन तयार होत असलेल्या रेडियम वेलची उपयोगीता लक्षात येते.

Web Title: Ballarpur will have abundant water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.