शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

बाळू धानोरकर यांना ४४ हजार ७६३ मताधिक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:25 AM

चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी २३ मे रोजी येथील एमआयडीसी दाताळा मार्गावरील वखार महामंडळाच्या परिसरात झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी ४४ हजार ७६३ मतांनी भाजपचे उमेदवार हंसराज अहीर यांचा पराभव केला.

ठळक मुद्देअधिकृत घोषणा : धानोरकर यांना निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी २३ मे रोजी येथील एमआयडीसी दाताळा मार्गावरील वखार महामंडळाच्या परिसरात झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी ४४ हजार ७६३ मतांनी भाजपचे उमेदवार हंसराज अहीर यांचा पराभव केला.बाळू धानोरकर यांना पाच लाख ५९ हजार ५०७ मते मिळाली तर भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांना पाच लाख १४ हजार ७४४ मते मिळाली. सर्व मतांच्या पडताळणीनंतर बाळू धानोरकर यांना रितसर विजयी घोषित करण्यात आले. यावेळी त्यांना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत निवडणूक निरिक्षक दिपांकन सिंन्हा आदी उपस्थित होते.चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान घेण्यात आले होते. एकूण मतदारांची संख्या १९ लाख चार हजार ३२ होती. त्यापैकी १२ लाख ३१ हजार १४७ एवढे मतदान झाले असून त्याची टक्केवारी ६४.६६ आहे. या निवडणुकीत एकूण १३ उमेदवार रिंगणात होते. त्यांना पोस्टल बॅलेटसह झालेले मतदान पुढील प्रामाणे आहे. बहुजन समाज पार्टीचे सुशील वासनिक यांना ११ हजार ८१०, बहुजन मुक्ती पार्टीचे गौतम नगराळे यांना २४५०, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे दशरथ मडावी यांना ३१०३, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नामदेव शेडमाके यांना ३०१७, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे नितेश डोंगरे यांना ४७०१, प्राउटिस्ट ब्लॉक इंडियाचे मधुकर निस्ताने यांना १५८९, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे यांना एक लाख १२ हजार ७९ मते तर अपक्ष उमेदवार अरविंद राऊत यांना १४७३, नामदेव किन्नाके यांना ५६३९, मिलिंद दहिवले यांना २४२६, राजेंद्र हजारे यांना ४५०५ मते आहेत. चंद्रपूर मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या हॉलमध्ये १४ टेबल होते. याकरिता ३२८ कर्मचारी व प्रत्येक टेबलसाठी राजपत्रित दर्जाचे मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यक नियुक्त होते.सर्वत्र विजयाचा जल्लोषकाँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर हे विजयी झाल्याचे गुरुवारी रात्री उशिरा स्पष्ट झाले. त्यानंतर आज शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात जल्लोष साजरा करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव चंद्रपूर येथे काँग्रेसने बाजी मारली. त्यामुळे येथील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. भद्रावती, वरोरा, गडचांदूर, मूल या ठिकाणी विजयी मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी चंद्रपूर येथेही विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी धानोरकर यांच्या विजयाच्या व पक्षाच्या घोषणा देण्यात आल्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल