बेटाळा इंजिनिअरींग कॉलेजच्या अध्यक्ष, सचिवांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2017 00:42 IST2017-04-09T00:42:53+5:302017-04-09T00:42:53+5:30

बेटाळा स्थित महाराष्ट्र कॉलेज आॅफ इंजिनिअरींग कुरखेडा येथील यंग इंजिनिअरींग सोसायटीचे अध्यक्ष देवेंद्र मुरारी पिसे व सचिव भारत जियालाल वाघमारे यांच्या विरोधात....

Baitala Engineering College President, Secretaries Offense | बेटाळा इंजिनिअरींग कॉलेजच्या अध्यक्ष, सचिवांवर गुन्हा

बेटाळा इंजिनिअरींग कॉलेजच्या अध्यक्ष, सचिवांवर गुन्हा

बनावट सही, शिक्के प्रकरण : एसडीओंनी केली तक्रार
ब्रह्मपुरी : बेटाळा स्थित महाराष्ट्र कॉलेज आॅफ इंजिनिअरींग कुरखेडा येथील यंग इंजिनिअरींग सोसायटीचे अध्यक्ष देवेंद्र मुरारी पिसे व सचिव भारत जियालाल वाघमारे यांच्या विरोधात तत्कालीन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व तलाठी यांचे बनावट सही व शिक्के बनवल्याचे उघडकीस आल्याने विद्यमान उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांनी आज सायंकाळी ब्रह्मपुरी पोलिसात तक्रार केली. त्यानुसार अध्यक्ष देवेंद्र मुरारी पिसे यास अटक केली असून सचिव भारत जियालाल वाघमारे रा. नागपूर यांच्या शोधात पोलीस रवाना झाले आहेत.
यंग इंजिनिअरींग सोसायटी कुरखेडा अंतर्गत बेटाळा येथे नवीन इमारतीचे बांधकाम गट नं. ४०२ मध्ये करण्यासाठी शेतीचे अकृषक रुपांतर करण्याकरिता तत्कालीन एसडीओ दीपा मुधोळ, तत्कालीन तहसीलदार आशिष वानखेडे, तलाठी आर. एस. राऊत यांच्या सहीचे बनावट शिक्के तयार करुन त्याचा वापर करण्यात आला व त्या बनावट सही व शिक्याचे कागदपत्र सहसंचालक तंत्रनिकेतन विभागीय कार्यालय, नागपूर येथे नवीन कॉलेज सुरु करण्यासाठी वापरण्यात आले. हे लक्षात आल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे संबंधित कागदपत्रे व तक्रार करण्यात आली. त्यानुसार चौकशी करुन आज शनिवारला सायंकाळी उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांनी ब्रह्मपुरी पोलिसात तक्रार दाखल केली असता गुन्हा नोंदविण्यात आला आहे.कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून अध्यक्ष देवेंद्र मुरारी पिसे यास अटक केली असून सचिव भारत जियालाल वाघमारे याला शोधण्यास पोलीस नागपूरला रवाना झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)

वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
- उमेश काळे, उपविभागीय अधिकारी
विद्यमान एसडीओ उमेश काळे यांनी लेखी रिपोर्ट दिली. त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तपास सुरु आहे.
- ओ. पी. अंबाडकर, पोलीस निरीक्षक

Web Title: Baitala Engineering College President, Secretaries Offense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.