रक्तदानाच्या उपक्रमातून बाबूजींना आदरांजली
By Admin | Updated: July 2, 2014 23:15 IST2014-07-02T23:15:03+5:302014-07-02T23:15:03+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची जयंती आज बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रक्तदानाच्या उपक्रमातून बाबूजींना आदरांजली
चंद्रपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची जयंती आज बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लोकमत वृत्तपत्र समूह, जीवनज्योती ब्लड बँक आणि कम्पोनेट लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक चंद्रपूर गडचिरोली श्रमिक पत्रकार संघ वरोरा नाका येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे महापौर संगिता अमृतकर, स्थायी समितीचे सभापती रितेश तिवारी, आयएमएचे राज्य उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश टिपणीस, डॉ. अशोक बोथरा, डॉ. भारती दुधानी, उपस्थित होते.
स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण व पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान, प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत या कार्यक्रमाचे कौतुक केले. (शहर प्रतिनिधी)