सुधाकर कडू यांना बाबा आमटे जीवन पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:45 IST2018-03-06T23:45:13+5:302018-03-06T23:45:13+5:30
बीड येथील शांतीवन संस्थेच्या वतीने दिला जाणारा कर्मयोगी बाबा आमटे स्मृती जीवन पुरस्कार आनंदवन महारोगी सेवा समितीचे विश्वस्त व आनंदवन ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुधाकर कडू यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

सुधाकर कडू यांना बाबा आमटे जीवन पुरस्कार
आॅनलाईन लोकमत
वरोरा: बीड येथील शांतीवन संस्थेच्या वतीने दिला जाणारा कर्मयोगी बाबा आमटे स्मृती जीवन पुरस्कार आनंदवन महारोगी सेवा समितीचे विश्वस्त व आनंदवन ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुधाकर कडू यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
यावेळी शांतीवन संस्थेचे संस्थापक दीपक नागरगोचे, अध्यक्ष सुरेश जोशी, बालहक्क राज्य आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, नरेंद्र मिस्त्री, दगडू लोमटे, सुहास सरदेशमुख, सविता व्होरा, दत्ता नलवाडे, प्राचार्य डॉ. सुखदेव माटे, शालन मिस्त्री, कावेरी नागरगोचे, भारती भोसले, राजाभाऊ शेळके, नाम फाऊंडेशनचे अजय किंगरे आदी उपस्थित होते. याच समारंभात राजाभाऊ चव्हाण व विणा गोखले यांना अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती तथा भीमथडी जत्रेचा पुरस्कार देण्यात आला. आनंदवन येथे विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी कडू यांनी मोलाचे कार्य केले आहे. शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले. उपसरपंच म्हणूनही त्यांनी गावाच्या विकासासाठी योगदान दिले.
कर्मयोगी बाबा आमटे यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याने नव्या उमेदीने समाजकार्य करू, असा आशावाद सुधाकर कडू यांनी व्यक्त केला आहे.