विजेचा शॉक लागून बाप-लेकीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 05:00 AM2020-10-04T05:00:00+5:302020-10-04T05:00:34+5:30

कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्याने त्याची मुलगी सेजल हीसुद्धा सोबत आली. शेतालगत नाला असल्याने पाणी भरण्यासाठी नाल्यावर आला. नाल्यावर मोटारपंप असून त्यातून जिवंत विद्युत प्रवाह सुरू होता. मुलगी पाणी पाहून खेळण्यासाठी पाण्यात उतरली असता तिला पाण्यात विजेचा धक्का बसला. ती खाली पडली. दरम्यान मुलीला वाचविण्यासाठी गेलेल्या स्वप्नीललाही विजेचा धक्का बसला. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

Baap-Leki dies of electric shock | विजेचा शॉक लागून बाप-लेकीचा मृत्यू

विजेचा शॉक लागून बाप-लेकीचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देराजुरा तालुक्यातील सिंधी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
विरूर स्टेशन : शेतालगत असलेल्या नाल्यावर पाणी भरण्याकरिता गेलेल्या बाप-लेकीला विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राजुरा तालुक्यातील सिंधी शिवारात शनिवारी घडली.
स्वप्नील सत्यपाल चाहारे (३२) तर सेजल स्वप्नील चाहारे (७) अशी मृतकांची नावे आहेत. मृत स्वप्नील हा आपल्या वडीलाला एकुलता एक होता तर सेजल ही आई वडिलांना एकुलती एक असल्याने या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नेहमी प्रमाणे स्वप्नील हा आपल्या वडिलांसोबत शेतात काम करण्याकरिता सिंधी शिवारात असलेल्या आपल्या शेतात आला. कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्याने त्याची मुलगी सेजल हीसुद्धा सोबत आली. शेतालगत नाला असल्याने पाणी भरण्यासाठी नाल्यावर आला. नाल्यावर मोटारपंप असून त्यातून जिवंत विद्युत प्रवाह सुरू होता. मुलगी पाणी पाहून खेळण्यासाठी पाण्यात उतरली असता तिला पाण्यात विजेचा धक्का बसला. ती खाली पडली. दरम्यान मुलीला वाचविण्यासाठी गेलेल्या स्वप्नीललाही विजेचा धक्का बसला. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. बराच वेळ होऊन दोघेही परत आले नाही म्हणून स्वप्नीलचे वडील सत्यपाल हे नाल्याकडे गेले. त्यांना दोघेही पाण्यात पडून दिसले. त्यावेळी आरडाओरड केली असता बाजूचे शेतकरी धावत आले. मोटारपंपाचे वायर तोडून त्यांना बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती विरुर पोलीस स्टेशनला मिळताच विरुरचे पोलीस निरीक्षक सदानंद वडतकर, मेजर पवार, मुंडे, जाधव यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

अश्रू झाले अनावर
मृत स्वप्नील हा एकुलता एक मुलगा होता. त्याची मुलगी सेजल ही त्यांना एकुलती एक होती. दोघांचाही एकाचवेळी असा मृत्यू झाल्याने गावातील प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.

Web Title: Baap-Leki dies of electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.