बह्मपुरीत महावितरणविरोधात हल्लाबोल आंदोलन

By Admin | Updated: June 29, 2017 01:31 IST2017-06-29T01:31:57+5:302017-06-29T01:31:57+5:30

वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियत्यांच्या मनमानी कारभारामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत.

The attacking movement against Bahamapuri Mahavitaran | बह्मपुरीत महावितरणविरोधात हल्लाबोल आंदोलन

बह्मपुरीत महावितरणविरोधात हल्लाबोल आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियत्यांच्या मनमानी कारभारामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. या अनुषंगाने गुरुवार दि. २९ रोजी दुपारी १२ वाजता ब्रह्मपुरी येथील कार्यकारी अभियंत्या कार्यालयावर वीज ग्राहकासह हल्लाबोल आंदोलन करुन वीज बिलाची होळी करण्यात येणार आहे.
ब्रह्मपुरी येथील कार्यकारी अभियंता मेश्राम यांच्या मानमानी कारभारामुळे विजेचे रिडीग निर्धारीत वेळेवर न झाल्याने हजारो ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसला. त्यामुळे आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या कार्यकारी अभियंत्यास निलंबीत करावे, या मागणीसाठी हल्लाबोल आंदोलनाचा इशारा आ. वडेट्टीवार यांनी महावितरणला दिला होता. यानुसार सदर आंदोलन करण्यात येणार आहे.
 

Web Title: The attacking movement against Bahamapuri Mahavitaran