चंद्रपूर जिल्ह्यात मधमाश्यांचा विद्यार्थ्यांवर हल्ला; २५ विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 20:37 IST2020-03-02T20:37:10+5:302020-03-02T20:37:36+5:30

बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर मधमाश्यांनी हल्ला चढवला. यात २५ विद्यार्थी जखमी झाले. ही घटना सोमवारी घडली.

Attack of honey bees on students in Chandrapur district; 25 student injured | चंद्रपूर जिल्ह्यात मधमाश्यांचा विद्यार्थ्यांवर हल्ला; २५ विद्यार्थी जखमी

चंद्रपूर जिल्ह्यात मधमाश्यांचा विद्यार्थ्यांवर हल्ला; २५ विद्यार्थी जखमी

ठळक मुद्देपळसगाव जि. प.शाळेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर मधमाश्यांनी हल्ला चढवला. यात २५ विद्यार्थी जखमी झाले. ही घटना सोमवारी घडली.
प्राथमिक शाळांच्या प्रांगणात असलेल्या पाण्याच्या टाकीवर मधमाश्यांचे पोळे होते. विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक करण्याकरिता चुल पेटविण्यात आली. चुलीतील धुरामुळे मधमाशा उडाल्या. त्यानंतर या मधमाश्यांनी विद्यार्थ्यांना चावा घेतला. यात २५ विद्यार्थी जखमी झाले. विद्यार्थ्यांच्या अंगावर सूज आली आहे. जखमी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी कळमना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. दरम्यान, या घटनेनंतर मुख्याध्यापकांनी शाळेला सुटी दिली. सदर शाळेच्या प्रांगणातील मधमाश्याचे पोळे तज्ज्ञ व्यक्तीद्वारे काढू, असे शाळा सुधार समितीचे अध्यक्ष प्रदीप तितरे यांनी सांगितले.

Web Title: Attack of honey bees on students in Chandrapur district; 25 student injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.