सुरक्षारक्षकांविनाच सुरू आहेत एटीएम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:25 IST2021-01-02T04:25:00+5:302021-01-02T04:25:00+5:30
----- खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांतील व गावाला जोडणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडले असून नागरिकांना नाहक त्रास ...

सुरक्षारक्षकांविनाच सुरू आहेत एटीएम
-----
खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांतील व गावाला जोडणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडले असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान ग्रामीण भागातील पांदण रस्त्यांची तर दयनीय अवस्था झाली आहे.
पथदिव्यांची नियमित तपासणी करावी
चंद्रपूर : शहरातील काही परिसरातील अनेक पथदिवे काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही खांबाचे दिवे बदलविण्यात आले तर काही दिवे फुटले आहेत. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर-नागपूर तसेच बल्लारपूर रस्त्यावरील पथदिवे अनेकवेळा बंद असतात.
-
बंद सिग्नलमुळे वाहनधारक त्रस्त
चंद्रपूर : येथील वडगाव, बापटनगर, तसेच मिलन चौकात सिग्नल आहे, मात्र ते बंद अवस्थेत असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, अनेकवेळा वाहतूक कोंडीही होत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन बंद सिग्नल सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.