जिल्हाधिकारी म्हणून आशुतोष सलील रुजू

By Admin | Updated: May 18, 2016 00:48 IST2016-05-18T00:48:00+5:302016-05-18T00:48:00+5:30

चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून आशुतोष सलील यांनी मंगळवारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून पदभार स्वीकारला.

Asutosh Salil, as Collector | जिल्हाधिकारी म्हणून आशुतोष सलील रुजू

जिल्हाधिकारी म्हणून आशुतोष सलील रुजू

चंद्रपूर : चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून आशुतोष सलील यांनी मंगळवारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून पदभार स्वीकारला.
आशुतोष सलील हे २०१० च्या बॅचचे आयएएस असून चंद्रपूर येथे येण्यापूर्वी त्यांनी वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे. तसेच यापूर्वी अमरावती येथे अपर जिल्हाधिकारी पदावर सुध्दा काम केले असून वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून जाण्यापूर्वी चंद्रपूर येथे उपविभागीय अधिकारी, प्रकल्प अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या विविध पदावर काम केले आहे. त्यांना चंद्रपूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती असल्याने चांगल्या कामाची अपेक्षा आहे.

Web Title: Asutosh Salil, as Collector