शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
2
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
3
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
5
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
6
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
7
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
8
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
9
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
10
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
11
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
12
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
13
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
14
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
15
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
16
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
17
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
18
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
19
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
20
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला

'समृद्धी'ची निविदा जाहीर होताच मुंबईच्या धनाढ्यांकडून लोकेशनचा शोध सुरू !

By राजेश मडावी | Updated: May 16, 2024 18:03 IST

Chandrapur : जमिनीचे झाले मार्किंग : 'त्या' ७६ गावांच्या शेतजमिनीला येणार सोन्याचा भाव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरील वर्धा जिल्ह्याच्या सेलडोह इंटरचेंजपासून दुर्ग हैदराबाद मार्गाला चंद्रपूर जिल्ह्यातील नवेगाव मोरे येथे जोडणाऱ्या शीघ्र संचार द्रुतगती मार्गासाठी ७६ गावांच्या जमिनी घेण्यात येतील. रस्ते विकास महामंडळ व बांधकाम विभागाने शेतात मार्किंग केले. गेल्या आठवड्यात निविदा जाहिर झाल्याने रस्त्यालगतच्या जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. मुंबईच्या अनेक धनाढ्यांनी लोकेशनचा शोध सुरू केला आहे.

नागपूर ते मुंबईला जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सुरू झाला. या महामार्गाला अन्य मार्ग जोडण्याचे काम सुरू झाले. रस्ते विकास महामंडळाच्या आराखड्यानुसार पोंभुर्णा, बल्लारपूर, राजुरा, कोरपना, चंद्रपूर, भद्रावती व वरोरा तालुक्यातून हा मार्ग जाणार आहे. याकरिता ७३ गावांतील शेती या मार्गासाठी अधिग्रहित केली जाणार आहे. हे तालुके समृद्धी महामार्गावरील वर्धा जिल्ह्याच्या सेलडोह इंटरचेंजपासून जोडले जातील. समृद्धीलाच जोडणारा घुग्घुस इंटरचेंज ते चंद्रपूर जोडरस्ताही तयार होणार आहे. समृद्धी महामार्ग पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागेल. हा महामार्ग समृद्धीच्या तुलनेत आकाराने लहान आहे. शासनाने यासाठी निधीची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात काम सुरु होण्यास बरेच दिवस जातील. मात्र या महामार्गाने चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक विश्वात मोठ्या उलाढाली होण्याचे संकेत आहेत. प्रत्यक्षात काही दिवसात स्पष्ट होईल.

कोट्यवधींच्या उलाढालीचे संकेतनागपूर ते चंद्रपूर १९५ किमी अंतरावरील समृद्धी महामार्गाच्या बांधकाम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) सर्वाधिक २२ निविदा आल्याची माहिती माध्यमांतून उघड झाली. या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद शहरातील बड्या मंडळींनी चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा, बल्लारपूर, राजुरा, कोरपना, चंद्रपूर, भद्रावती व वरोरा तालुक्यांचा दौरा करून महामार्गाचे संभाव्य लोकेशन जाणून घेतल्याची माहिती वरोरा येथील शेतकऱ्यांनी दिली.

अशी आहेत गावे भद्रावतीचोपन रिठ, गोटाळा रिठ, खंडाळा रिठ, कोंडा, कुरोडा, विजासन, कुनाड़ा टोला, चारगाव, लोणार रिठ. ढोरवासा, तेलवासा, पिपरी, घोनाड, मुरसा, बोरगाव रिठ गावातील शेती या मार्गात जाणार आहे.

वरोरा तालुकाबोडखा, चक मकसूर, चक कवडापूर, सुमठाणा, मांडवगुहाड, बोरगाव, शिवणफळ, पांढरतळा, आसाळा, पाचगाव, पिजदूरा, बोरगाव देश, सालोरी, खातोडा, वलनी वनग्राम, परसोडा, जामगाव, जाम खुर्द.

चंद्रपूरशेणगाव, पांढरकवडा, वढा, धानोरा, पिप्री

कोरपनाभोयेगाव, नांदगाव, कोराडी, नवेगाव, निमणी

राजुरावरोडा, हिरापूर, चिंचोळी, चिंचोळी खुर्द, अंतरगाव खु, गोवरी, माथरा, धोपटाळा, गडपडखामी, बामनवाडा, चुनाळा

बल्लारपूरआष्टी, कळमना, जोगापूर, जेवरा, कोर्टीमक्ता, पळसगाव, किन्ही, कवडजई

पोंभुर्णाचक घनोटी १, चक घनोटी २, घनोटी तुकूम, बोर्डा रिठ, कसरगट्टा, पोंभुर्णा, चक पोंभुर्णा, आष्टा, वेळवा चक, नवेगाव चक, चक खापरी, नवेगाव मोरे, चक ठाणेवासना, घाटकूळ

शेतकरी काय म्हणतात..?समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहित करताना काहींची संपूर्ण शेती, तर काहींच्या शेतीचा केवळ एक कोपरा जाणार आहे. मुख्य मार्ग तयार करताना शेतीकडे जाणारा रस्ता आणि मोबदल्याचे स्वरूप कसे राहणार, याबाबत राज्य शासनाने अद्याप निर्णय घेतला नाही; परंतु अन्याय होईल, असा कोणताही नियम घाईने लागू न करता, शेतकऱ्यांचे म्हणणे आधी समजून घ्यावे, अशी अपेक्षा शेतकरी श्रीधर लोंढे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गchandrapur-acचंद्रपूर