शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

पाणीपुरवठ्याची प्रलंबित कामे मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 05:00 IST

खासदार धानोरकर म्हणाले, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यावरील एकूण २० पुलांचे बांधकाम अपूर्ण आहे. ते काम कुठे अडले याबाबत विभागांनी माहिती घ्यावी. पुलाच्या बांधकामाचे प्रस्ताव १५ दिवसांच्या आत तयार करून मंजुरीसाठी सादर करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. प्रपत्र ‘ड’ यादीत काही घरकूल लाभार्थ्यांची नावे ऑनलाईन मध्ये सुटली आहेत, अशांची माहिती घेत दखल घ्यावी. ज्या गावातील नागरिकांना अजूनही घरकूल मिळाले नाही त्या गावांचा प्रस्ताव शासनाला सादर करावा, अशा सूचना केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याच्या योजना महत्त्वाच्या असून कोरोना काळात काही कामे प्रलंबित होती. मात्र, कोरोना कमी झाल्याने ही प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा, असे निर्देश खासदार बाळू धानोरकर यांनी  दिले. नियोजन भवनात बुधवारी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, खासदार अशोक नेते, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वर्षा गौरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, श्याम वाखर्डे, प्रकल्प अधिकारी  बक्षी आदी उपस्थित होते.खासदार धानोरकर म्हणाले, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यावरील एकूण २० पुलांचे बांधकाम अपूर्ण आहे. ते काम कुठे अडले याबाबत विभागांनी माहिती घ्यावी. पुलाच्या बांधकामाचे प्रस्ताव १५ दिवसांच्या आत तयार करून मंजुरीसाठी सादर करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. प्रपत्र ‘ड’ यादीत काही घरकूल लाभार्थ्यांची नावे ऑनलाईन मध्ये सुटली आहेत, अशांची माहिती घेत दखल घ्यावी. ज्या गावातील नागरिकांना अजूनही घरकूल मिळाले नाही त्या गावांचा प्रस्ताव शासनाला सादर करावा, अशा सूचना केल्या. प्रकल्प संचालक वर्षा गौरकर यांनी सादरीकरण केले. यावेळी भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, गोंडपिपरी पं. स. सभापती सुनीता येग्गेवार, जिवती पं.स. सभापती अंजना पवार, राजूरा पं. स. सभापती मुमताज अब्दुल, सावली पं.स. सभापती विजय कोरेवार, सिंदेवाही पं.स. सभापती मंदा बाळबुधे, नागभीड पं.स. सभापती प्रफुल्ल खापर्डे, जि. प. सदस्य सुनीता धोटे, पवन भगत, कुंदा जेनेकर, कुचनाच्या सरपंच वर्षा ठाकरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

चार गावांचा पाणीपुरवठा बंदजलजीवन मिशन अंतर्गत वरोरा तालुक्यातील शेंबळ, राळेगाव, फत्तापूर व बोडखा या चार गावांचा पाणीपुरवठा बंद आहे. तो कार्यान्वित करावा. शालेय पोषण आहार योजना संदर्भात केंद्र व राज्य शासनाकडून धान्याचा पुरवठा होतो. त्याचा दर्जा व साठवणूक आदींसाठी धान्याच्या गोडाऊनची पाहणी करावी. आठवड्यातून एकदा शाळांना भेटी द्याव्यात, अशा सूचनाही खासदार धानोरकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना  केल्या.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीWaterपाणी