वाहनाचा पाठलाग करून साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:58 IST2017-11-23T23:57:47+5:302017-11-23T23:58:11+5:30
नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावरून अवैधरीत्या दारूची वाहतूक करीत असताना वाहनाचा पाठलाग करून घोडपेठजवळ पोलिसांनी वाहन अडवून दारूसाठा जप्त केला.

वाहनाचा पाठलाग करून साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावरून अवैधरीत्या दारूची वाहतूक करीत असताना वाहनाचा पाठलाग करून घोडपेठजवळ पोलिसांनी वाहन अडवून दारूसाठा जप्त केला. मात्र वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. ही कारवाई गुरुवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
मारूती सुझूकी क्र. एम.एच. ०४. डी.जे. १४९५ हे वाहन नागपूर-मार्गे चंद्रपूरकडे दारू घेऊन येत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. त्या आधारे ठाणेदार डी.बी. मडावी, नरेश शेरकी, राजेश वºहाडे, केशव चिटगिरे, सचिन गुरनुले यांनी या वाहनाला टप्प्यावर थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनचालकाने तिथे वाहन थांबविले नाही. उलट भरधाव वेगाने वाहन चंद्रपूरकडे नेले. दरम्यान, भद्रावती पोलिसांनी गाडीचा पाठलाग केला. त्या चालकाने वाहन घोडपेठजवळ थांबवून तिथून पसार झाला.
पोलिसांनी वाहनातील देशी दारूच्या पेट्या (किंमत तीन लाख ५० हजार रुपये) व वाहन, असा आठ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.