एपीएल, बीपीएल कार्डधारक सुविधांपासून वंचित

By Admin | Updated: February 1, 2017 00:38 IST2017-02-01T00:38:04+5:302017-02-01T00:38:04+5:30

एपीएल तसेच बीपीएल राशन कार्डधारकांना स्वस्त दरात धान्य तसेच रॉकेलची सुविधा मिळते.

Approved from the APL, BPL card holder facilities | एपीएल, बीपीएल कार्डधारक सुविधांपासून वंचित

एपीएल, बीपीएल कार्डधारक सुविधांपासून वंचित

श्रमिक एल्गार संघटना : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
चंद्रपूर : एपीएल तसेच बीपीएल राशन कार्डधारकांना स्वस्त दरात धान्य तसेच रॉकेलची सुविधा मिळते. मात्र जिल्ह्यातील अनेक कार्डधारक या सुविधेपासून वंचित आहेत. त्यांना या सुविधांचा पुरेपूर लाभ मिळावा, अशी मागणी श्रमिक एल्गार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
जिल्ह्यात एपीएल, बीपीएल कार्डधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, त्यांना नियमितरित्या धान्य तसेच रॉकेल पुरविल्या जात नाही. ज्यांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आले. अशाच कार्डधारकांना युनिटप्रमाणे धान्य दिल्या जाते. त्यामुळे कार्डधारकांना खुल्या बाजारातून धान्य खरेदी करावी लागते. तसेच जिल्ह्यात रॉकेलचा मोठा तुटवडा आहे. यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे तर परवानाधारकांकडून रॉकेल खुल्या बाजारात विकल्या जात आहे. यामुळे गरजूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेकांना सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या काळाबाजारीवर प्रशासनाने कारवाई करणे आता गरजेचे झाले आहे. या समस्येकडे जबाबदार प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी श्रमिक एल्गार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Approved from the APL, BPL card holder facilities