चिमूरसह पाच नगर पंचायतीच्या अंतिम प्रभाग रचनेस मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:20 IST2021-01-01T04:20:19+5:302021-01-01T04:20:19+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यातील चिमूर, सावली, पोंभुर्णा, जिवती, कोरपना व गोंडपिंपरी या सहा नगर परिषद व नगर पंचायतीच्या अंतिम प्रभाग ...

चिमूरसह पाच नगर पंचायतीच्या अंतिम प्रभाग रचनेस मान्यता
चंद्रपूर : जिल्ह्यातील चिमूर, सावली, पोंभुर्णा, जिवती, कोरपना व गोंडपिंपरी या सहा नगर परिषद व नगर पंचायतीच्या अंतिम प्रभाग रचनेस विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन नागपूर यांनी २४ डिसेंबरच्या आदेशान्वये मान्यता दिली आहे.
संबंधित नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संबंधित शहराची विभागणी नवीन प्रभागामध्ये केली असून त्यांचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा व सीमा प्रदर्शित केलेल्या अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना संबंधित नगर पंचायतीच्या कार्यालयाच्या तसेच जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासन अधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले.
चिमूर नगर परिषदमध्ये अनुसूचित जातीकरिता प्रभाग क्रमांक १७, अनुसूचित जाती (स्री) करिता प्रभाग क्रमांक ३, अनुसूचित जमाती करिता प्रभाग क्रमांक ४, अ.ज.(स्री) करिता प्रभाग क्रमांक ९ व १२, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक ७ व ११, नागरिकांच्या मागास प्रवर्ग (स्री) करिता प्रभाग क्रमांक १, १४ व १५, सर्वसाधारण करिता प्रभाग क्रमांक ५, ८, १० व १३, सर्वसाधारण (स्री) करिता प्रभाग क्रमांक २, ६ व १६.
बॉक्स
सावलीसाठी असे आहेत आरक्षण
सावली नगरपंचायतमध्ये अनुसूचित जाती करिता प्रभाग क्रमांक १ व १५, अनुसूचित जाती (स्री) करिता प्रभाग क्रमांक १७ व १७, अनुसूचित जमाती करिता प्रभाग क्रमांक निरंक, अ.ज.(स्री) करिता प्रभाग क्रमांक ५, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक ६ व ७, नागरिकांच्या मागास प्रवर्ग (स्री) करिता प्रभाग क्रमांक ३, १० व ११, सर्वसाधारण करिता प्रभाग क्रमांक २, ४, ९ व १२, सर्वसाधारण (स्री) करिता प्रभाग क्रमांक ८, १३ व १४.
बॉक्स
पोंभूर्णा नगर पंचायत
पोंभुर्णा नगर पंचायतमध्ये अनुसूचित जातीकरिता प्रभाग क्रमांक १, अनुसूचित जाती (स्री) करिता प्रभाग क्रमांक ३ व १५, अनुसूचित जमाती करिता प्रभाग क्रमांक १०, अ.ज.(स्री) करिता प्रभाग क्रमांक निरंक, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक ११ व १७, नागरिकांच्या मागास प्रवर्ग (स्री) करिता प्रभाग क्रमांक ४, ८ व १२, सर्वसाधारणकरिता प्रभाग क्रमांक ५, ७, ९ व १४, सर्वसाधारण (स्री) करिता प्रभाग क्रमांक २, ६, १३ व १६
जिवती नगरपंचायत.
जिवती नगरपंचायतमध्ये अनुसूचित जाती करिता प्रभाग क्रमांक १, अनुसूचित जाती (स्री) करिता प्रभाग क्रमांक निरंक, अनुसूचित जमाती करिता प्रभाग क्रमांक १०, अ.ज.(स्री) करिता प्रभाग क्रमांक १२ व १६, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक ४ व ६, नागरिकांच्या मागास प्रवर्ग (स्री) करिता प्रभाग क्रमांक २, ७ व १५, सर्वसाधारणकरिता प्रभाग क्रमांक ५, ९, १३ व १४, सर्वसाधारण (स्री) करिता प्रभाग क्रमांक ३, ८, ११ व १७.
बॉक्स
कोरपना नगर पंचायत
कोरपना नगर पंचायतमध्ये अनुसूचित जातीकरिता प्रभाग क्रमांक १६, अनुसूचित जाती (स्री) करिता प्रभाग क्रमांक ११, अनुसूचित जमातीकरिता प्रभाग क्रमांक १०, अ.ज.(स्री) करिता प्रभाग क्रमांक १३ व १४, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक १२ व १७, नागरिकांच्या मागास प्रवर्ग (स्री) करिता प्रभाग क्रमांक १, २, व ८ सर्वसाधारणकरिता प्रभाग क्रमांक ३, ५, ६ व ९, सर्वसाधारण (स्री) करिता प्रभाग क्रमांक ४, ७ व १५.
बॉक्स
गोंडपिपरी नगर पंचायत
गोंडपिपरी नगर पंचायतमध्ये अनुसूचित जातीकरिता प्रभाग क्रमांक २, अनुसूचित जाती (स्री) करिता प्रभाग क्रमांक ४, अनुसूचित जमातीकरिता प्रभाग क्रमांक १४, अ.ज.(स्री) करिता प्रभाग क्रमांक ९ व १३, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक १ व १७, नागरिकांच्या मागास प्रवर्ग (स्री) करिता प्रभाग क्रमांक ८, ११ व १५, सर्वसाधारणकरिता प्रभाग क्रमांक ३, ५, ७ व १६, सर्वसाधारण (स्री) करिता प्रभाग क्रमांक ६, १० व १२.