अंगणवाडी महिलांना पेन्शन लागू करा
By Admin | Updated: August 3, 2014 00:01 IST2014-08-03T00:01:53+5:302014-08-03T00:01:53+5:30
गुंजेवाही सर्कल मधील अंगणवाडी महिलांचा मेळावा संयोगीता गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी अंगणवाडी महिलांना पेंशन लागू करण्याची मागणी करण्यात आली.

अंगणवाडी महिलांना पेन्शन लागू करा
सिंदेवाही : गुंजेवाही सर्कल मधील अंगणवाडी महिलांचा मेळावा संयोगीता गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी अंगणवाडी महिलांना पेंशन लागू करण्याची मागणी करण्यात आली.
मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून कुंद वाघमारे, प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना अर्चना शेडमाके म्हणाल्या, अंगणवाडी महिलांना चार-चार महिने मानधन दिल्या जात नाही. मिटींगला बोलविल्या जाते. परंतु दोन-दोन वर्ष टि.ए. बिल दिल्या जात नाही. गावागावांत अंगणवाड्या आहे परंतु अनेक ठिकाणी इमारत नाही. मुलांना झाडाखाली बसावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दीघ्र लढ्यानंतर अंगणवाडी सेविकांना राज्य शासनातर्फे सेवानिवृत्ती लाभ म्हणून एक लाख रुपये मंजूर केले. मात्रे पेंशनचा खरा प्रश्न आहे. केंद्र शासनाने संसदीय समितीच्या शिफारशीनुसार अंगणवाडी महिलांना पेंशन लागु करावी,अशी मागणी प्रा. दहीवडे यांनी केली. तर संयोगीता गेडाम यांनी अंगणवाडी महिलांच्या प्रश्नाबाबत शासन तसेच अधिकारी वर्ग देखील उदासिन असल्याचे त्या म्हणाल्या. यायाच परिणाम पैसे येऊन देखील मानधन वेळेवर मिळत नाही. टि.ए. बिल देखील देण्यात येत आहे. तीन वर्षानंतर आता केंद्र शासनाने वाढ करावयास पाहिजे होती परंतु मोदी सरकारने वाढ दिली नाही. अंगणवाडी महिलांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे आता महिलांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. शासनाने अंगणवाडी मंहिलांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याची आरोपही त्यांनी केला. आभार अंजिरा कोलते यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)